24 तासात 2 हत्येनं लोणावळा हादरलं, शिवसेनेच्या माजी शहराध्यक्षाची भरचौकात हत्या

24 तासात 2 हत्येनं लोणावळा हादरलं, शिवसेनेच्या माजी शहराध्यक्षाची भरचौकात हत्या

राहुल शेट्टी यांचा सहकारी गणेश नायडू याची दसऱ्याच्या दिवशी हत्या करण्यात आली होती. रविवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

  • Share this:

आनिस शेख, प्रतिनिधी

लोणावळा, 26 ऑक्टोबर : लोणावळा शहर (lonavala) 24 तासांमध्ये हत्येच्या लागोपाठ दोन घटनांनी हादरले आहे. रविवारी रात्री सहकाऱ्याच्या हत्येनंतर आज सकाळी  शिवसेनेचे (Shivsena ) माजी शहराध्यक्ष राहुल उमेश शेट्टी (Rahul Shetty)यांची भरचौकात हत्या (murder)करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शिवसेना माजी शहरप्रमुख व शिवसेना संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी (Umesh Shetty) यांचे पुत्र राहुल शेट्टी हे जयचंद चौक येथील त्यांच्या कार्यालयाजवळ आले होते. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडत तसेच धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या केली. सकाळच्या सत्रात अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी भर चौकात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

कंगनाचा मुख्यमंत्र्यांवर पुन्हा घणाघात, एकेरी उल्लेख करून केली टीका, VIDEO

राहुल शेट्टी यांच्या डोक्यावर आणि मानेवर धारधार शस्त्रांनी वार करण्यात आले आहेत. तसंच तीन गोळ्याही झाडल्या आहेत. त्यांना तातडीने लोणावळ्यातील परमार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

धक्कादायक म्हणजे, राहुल शेट्टी यांचा सहकारी गणेश नायडू याची दसऱ्याच्या दिवशी हत्या करण्यात आली होती. रविवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास हनुमान टेकडी येथे अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून गणेश नायडू यांचा खून केला होता. या घटनेला काही तास उलटत नाही तेच सकाळी राहुल शेट्टी यांची हत्या करण्यात आली आहे.

परवानगी नसताना काढली पालखी, सेनेच्या आमदारासह 50 जणांविरोधात गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. राहुल शेट्टी यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. एकापाठोपाठ झालेल्या हत्येच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही हत्यांमध्ये काही कनेक्शन आहे का त्या दृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहे.

Published by: sachin Salve
First published: October 26, 2020, 2:31 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading