'गावात दवाखाना चालवायचा तर 25 हजार हफ्ता दे', माजी सरपंचाने मागितली डॉक्टराकडे खंडणी

गावातील लोकांना सांगून तुझ्या विरुद्ध खोट्या तक्रारी करायला लावू' अशी धमकीच या माजी सरपंचाने डॉक्टराला दिली होती.

गावातील लोकांना सांगून तुझ्या विरुद्ध खोट्या तक्रारी करायला लावू' अशी धमकीच या माजी सरपंचाने डॉक्टराला दिली होती.

  • Share this:
पुणे, 03 ऑक्टोबर : पुणे (Pune) जिल्ह्यातील शिक्रापूर (ता.शिरूर) येथील डॉ. रामेश्वर विठ्ठलराव बंडगर यांच्याकडे गावात दवाखाना (Hospital) चालवायचा असेल तर महिन्याला 25 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल नाहीतर दवाखाना चालू देणार नाही, असे म्हणून पैसे मागणाऱ्या शिक्रापुरचा माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांच्यावर शिक्रापूर पोलीस (Shikrapur Police)ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर विठ्ठलराव बंडगर ( वय वर्षे 28, राहणार माळीमळा, शिक्रापूर तालुका शिरूर) हे व्यवसायाने डॉक्टर असून त्यांचा शिक्रापूर गावात दवाखाना आहे. 24 तारखेला शिक्रापूर गावचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे यांनी रामेश्वर बंडगर यांना आपल्या कार्यालयात बोलावून, 'तुला शिक्रापूर गावच्या हद्दीत हॉस्पिटल चालवायचे असेल तर महिन्याला 25 हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर तुला मी दवाखाना चालू देणार नाही. गावातील लोकांना सांगून तुझ्या विरुद्ध खोट्या तक्रारी करायला लावू' असा दम दिला. स्टेशन सोडून हवेत निघाली मेट्रो, अपघात होणार तेवढ्यात समोर आला व्हेल मासा आणि.. 'गावामध्ये फक्त माझेच राज्य आहे', अशी धमकी देऊन खंडणीची मागणी केली याबाबत रामेश्वर बंडगर यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कट्टर शिवसेना नेत्याची गळफास घेऊन आत्महत्या, इगतपुरीत खळबळ सदर गुन्हयाचा तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहा, पोलीस निरीक्षक मयुर वैरागकर हे करीत आहेत. अशा प्रकारे आणखी कुणाला खंडणीची मागणी होत असल्यास लोकांनी निर्भयपणे शिक्रापुरः पोलीस ठाण्यात 021-3728633 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन शिक्रापूर पोलिसांनी केले आहे.
Published by:sachin Salve
First published: