देहरादून, 28 मे : उत्तराखंड सरकारच्या (Uttarakhand News) माजी मंत्र्यांवर छेडछाड केल्याचा आरोप केल्याच्या काही दिवसांनंतर त्यांनी गोळी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी मंत्र्यांनी पाण्याच्या टाकीवर उभं राहून स्वत:ला गोळी (Suicide) घातली. हल्द्वानीचे अंचल अधिकारी भूपेंदर सिंह धोनीने सांगितलं की, माजी मंत्र्यांच्या सूनेने त्यांच्यावर नातीची छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्याविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
धोनींनी पुढे सांगितलं की, शेजारच्याच्या तक्रारीनंतर त्यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेजारच्यांनी सासूला शिवीगाळ करणे, धमकी देणे आणि हल्ला केल्याचा आरोप केला होता. आत्महत्येपूर्वी माजी मंत्र्यांनी पोलिसांना फोन केला आणि शेवटी पाण्याच्या टाकीवर चढून पिस्टलने आत्महत्या केली.
आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल...
माजी मंत्र्याच्या आत्महत्येनंतर सुनेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीओ म्हणाले, "पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि बऱ्याच चर्चेनंतर त्यांना पाण्याच्या टाकीवरुन खाली येण्यास सांगितलं. परंतू त्यांनी ऐकलं नाही, आणि अचानक बंदूकीने छातीत गोळी झाडली.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.