त्र्यंबकेश्वर हादरलं, भरदिवसा माजी नगराध्यक्षाची गळा चिरून हत्या

त्र्यंबकेश्वर हादरलं, भरदिवसा माजी नगराध्यक्षाची गळा चिरून हत्या

त्र्यंबकेश्वरमध्ये माजी नगरध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:

नाशिक, 21 ऑक्टोबर : नाशिक जिल्ह्यातील  त्र्यंबकेश्वरमध्ये दिवसाढवळ्या माजी नगरध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार यांची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

धनंजय तुंगार यांचे भाऊ शेखर तुंगार यांचे निधन झाले आहे. शेखर यांच्या निधनानंतर आज 12 व्याचा कार्यक्रम सुरू होता. विधी सुरू असताना धनंजय तुंगार यांना एक फोन आला होता. त्यानंतर धनंजय तुंगार हे ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या अहिल्या धरणाकडे गेले होते. त्यावेळी हल्लेखोर हे दबा धरून बसलेले होते.

कांदा घेणे परवडत नसेल तर लसूण-मुळा खा, बच्चू कडूंचा हटके सल्ला, VIDEO

तुंगार जसे धरणाच्या परिसरात पोहोचले तेव्हा त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. गळ्यावर सुऱ्याने वार करण्यात आले होते. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे तुंगार जागेवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. अति रक्त स्त्राव झाल्यामुळे जागेवर धनंजय तुंगार यांचा मृत्यू झाला. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये खळबळ उडाली.

घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून धनंजय तुंगार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.

गुन्हे दाखल करणे ही भाजपची संस्कृती नाही, दरेकरांचं खडसेंना प्रत्युत्तर

धनंजय तुंगार हे सुरुवातीला काँग्रेस पक्षात होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. माजी नगराध्यक्ष तुंगार यांच्या हत्येमुळे पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवली. अवघ्या काही तासांत एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले.  समीर गोंदके असं या संशयिताचे नाव आहे. समीर हा गांज्याच्या नशेत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.  पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Published by: sachin Salve
First published: October 21, 2020, 5:24 PM IST

ताज्या बातम्या