मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

ऑनलाईन दारु पडली महागात! सायबर ठगांचा माजी IAS अधिकाऱ्याला लाखोंचा गंडा

ऑनलाईन दारु पडली महागात! सायबर ठगांचा माजी IAS अधिकाऱ्याला लाखोंचा गंडा

माजी IAS अधिकाऱ्यांने अवघ्या 630 रुपयांची ऑर्डर दिली होती. मात्र याबदल्यात निवृत्त आयएएस अधिकाऱ्याच्या क्रेडिट कार्डमधून सुमारे 2 लाख रुपये गायब झाल्याचा आरोप आहे.

माजी IAS अधिकाऱ्यांने अवघ्या 630 रुपयांची ऑर्डर दिली होती. मात्र याबदल्यात निवृत्त आयएएस अधिकाऱ्याच्या क्रेडिट कार्डमधून सुमारे 2 लाख रुपये गायब झाल्याचा आरोप आहे.

माजी IAS अधिकाऱ्यांने अवघ्या 630 रुपयांची ऑर्डर दिली होती. मात्र याबदल्यात निवृत्त आयएएस अधिकाऱ्याच्या क्रेडिट कार्डमधून सुमारे 2 लाख रुपये गायब झाल्याचा आरोप आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 7 ऑगस्ट : डिजिटल युगात एक छोटी चूक तुमचं मोठं नुकसान करु शकते. कारण सायबर गुन्हेगार फसवणुकीसाठी वेगवेगळ्या आयडिया वापरत आहेत आणि लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. हरियाणातील गुरुग्राममध्ये तर एका माजी सनदी अधिकाऱ्यालाच गुन्हेगारांनी गंडा घातला आहे. आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे. गुरुग्रामच्या सुशांत लोक भागात राहणाऱ्या माजी आयएएस अधिकारी जोहरा चॅटर्जी यांना ऑनलाइन दारू ऑर्डर करणे महागात पडले आहे. 23 जुलै रोजी जोहरा यांच्या घरी पार्टी होती त्यासाठी त्यांनी दारूची ऑनलाईन ऑर्डर दिली. अवघ्या 630 रुपयांची ही ऑर्डर होती. मात्र याबदल्यात निवृत्त आयएएस अधिकाऱ्याच्या क्रेडिट कार्डमधून सुमारे 2 लाख रुपये गायब झाल्याचा आरोप आहे. बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, जोहरा चॅटर्जी 23 जुलै रोजी पार्टी आयोजित करण्यात व्यस्त होत्या. दरम्यान, त्यांनी संध्याकाळी 6 च्या सुमारास jagdishwineshopgurgaon.com या वेबसाइटवर पाहुण्यांसाठी घरपोच दारूची ऑर्डर दिली. त्यांनी सांगितले की माझ्या मोबाईलवर ऑर्डर दिल्यानंतर मला फोन आला. व्यस्त असल्याने घाईत कॉलरवर विश्वास ठेवून मी माझा क्रेडिट कार्ड नंबर आणि वन-टाइम पासवर्ड (OTP) सांगितला. मात्र त्यानंतर कार्डमधून कापलेली रक्कम पाहून त्यांना धक्काच बसला. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, मला माझ्या मोबाईलवर एक एसएमएस आला की क्रेडिट कार्डवरून 630 रुपये डेबिट झाल्याची माहिती देणारा OTP त्यात होता. मात्र काही वेळाने त्यांनी तपासले तेव्हा 630 रुपये नव्हे तर 1,92,477.50 रुपयांचा व्यवहार झाल्याचे त्यांनी दिसले. याप्रकरणी आरोपींना लवकरात लवकर पकडले जाईल. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 419 आणि 420 आणि आयटी कायद्याच्या कलम 66-डी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ दारूच्या होम डिलिव्हरीशी संबंधित ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधीही वेबसाईटच्या माध्यमातून इतर अनेकांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे. अशा प्रकरणाचा तपास केल्यानंतर 1 ऑगस्ट रोजी गुरुग्राम पोलिसांनी तीन जणांच्या टोळीला अटक केली. या आरोपींनी घरपोच दारू देण्याचे आश्वासन देऊन एक लाखाहून अधिक रुपयांची फसवणूक केली होती.
First published:

Tags: Crime news, Online fraud

पुढील बातम्या