भीषण गोळीबारात माजी ग्रामपंचायत सदस्य जागीच ठार

भीषण गोळीबारात माजी ग्रामपंचायत सदस्य जागीच ठार

अंभोरे हे गावातल्या पान टपरीजवळ उभे असताना त्याच्या जवळ एक मोटरसायकल येऊन उभी राहिली आणि त्यांनी गोळीबार केला.

  • Share this:

जालना 07 ऑक्टोंबर : राज्यात निवडणुकीचं वारं असताना जालन्याजवळ आज खळबळजनक घटना घडलीय. सेलगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संजय अंभोरे यांच्यावर अज्ञात इसमांनी भीषण गोळीबार केला. या गोळीबारात अंभोरे यांचा जागीच मृत्यू झाला. बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथील ही घटना आहे. हा गोळीबार नेमका कशामुळे करण्यात आला याचं नेमकं कारण कळू शकतं नाही. पोलीस आता घटनेचा तपास करत आहेत. मात्र अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत त्यामुळे गावातही भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अंभोरे हे गावातल्या पान टपरीजवळ उभे असताना त्याच्या जवळ एक मोटरसायकल येऊन उभी राहिली. या मोटर सायकलवर दोन जण होते. त्यांनी हेल्मेट घातलेलं होतं त्यामुळे त्यांची ओळख होऊ शकली नाही.

...तर महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, PMC बँक घोटाळ्यात नेत्यांना घरांची भेट

दुचाकीवर हेल्मेट घालून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी अंबोरे यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. यापूर्वी देखील अंभोरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती दिली जातेय. संजय अंभोरे हे MIDCमध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टर होते.

या भागात कारखान्यांना कामगार पुरवण्यावरून अनेक गट काम करतात. या गटांमध्ये आपसात भांडणं आहेत. त्या भांडणातूनच हा हल्ला झाला असावा असा संशय व्यक्त केला जातेय. पोलीस तपास करत असून तापासानंतरच नेमकं कारण कळू शकेल अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

आई आमदार व्हावी म्हणून मुलाने घेतली रिंगणातून माघार!

भुसावळमध्येही गँगवॉर

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुसावळ शहर गॅंगवारने हादरलं आहे. भाजपचे (आठवले गट) नगरसेवक रवींद्र उर्फ हंप्या खरात यांच्यासह कुटुंबावर घरात घुसून मारेकऱ्यांना अंदाधूंद गोळीबार केला. नंतर चाकू आणि गुप्तीने सपासप वार केले. यात नगरसेवक रवींद्र खरात यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. आरपीडी रोडवरील मध्य रेल्वे हॉस्पिटल परिसरातील लाल चर्चसमोर समतानगर भागात रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास हा थरार घडला.

'युती'ला धडा शिकविण्यासाठी 'मनसे' राष्ट्रवादीची छुपी खेळी!

सागर रवींद्र खरात, हंसराज रवींद्र खरात, रवींद्र उर्फ हंप्या बाबुराव खरात, सुनील बाबुराव खरात आणि मोहित गजरे यांचा मृतांत समावेश आहे. घटनेच्या तीन तासांनी संशयित आरोपी शेखर मेघे, मोहसीन अजगर खान आणि मयुरेश सुरडकर या तिघांनी जळगाव एलसीबीकडे शरणागती पत्करल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. पोलिस इतर आरोपींचा शोध घेत आहेत. पूर्ववैमनस्यातून हे गॅंगवार झाल्याचे जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2019 09:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading