Home /News /crime /

माजी सरकारी अधिकाऱ्यानं केली मोलकरणीची हत्या; कारण ऐकून धक्का बसेल

माजी सरकारी अधिकाऱ्यानं केली मोलकरणीची हत्या; कारण ऐकून धक्का बसेल

कामावर येण्यास नकार दिल्याने निवृत्त सरकारी अधिकाऱ्याने (Former Government Official) चक्क आपल्या मोलकरणीची हत्या केली. उत्तरप्रदेशातील रामपूर येथील घटना.

    रामपूर, 06 डिसेंबर : अगदी क्षुल्लक कारणावरुन मालकाने मोलकरणीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Crime) रामपूर (Rampur) या ठिकाणी घडली आहे. कामावर येण्यास नकार दिल्याने एका निवृत्त सरकारी अधिकाऱ्याने (Former Government Official) चक्क आपल्या मोलकरणीची हत्या केली आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी घरी येऊन काम करण्यास मोलकरणीनं नकार दिला होता. हा राग मनात धरुन हा निवृत्त अधिकारी थेट तिच्या घरी जावून पोहोचला. तिथे गेल्यानंतर त्याने सर्वप्रथम मोलकरणीला धमकावले. नंतर या क्षुल्लक कारणाचे रुपातंर गंभीर वादात झाले.  राग सहन न झाल्याने या निवृत्त अधिकाऱ्याने थेट तिची गोळ्या घालून हत्या केली आहे. तसंच तिच्या मुलीवरही हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या प्रकारामुळे रामपूर परिसरात खळबळ माजली. पोलिसांनी संबंधित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छिदावाला गावात हा धक्कादायक प्रकार घडला. निवृत्त सरकारी अधिकारी सोमपाल सिंह यांच्या घरी गावातीलच एक महिला घरकाम करायची. पण या महिलेने शनिवारी कामावर येण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात सोमपाल सिंह तिच्या घरी गेला. सुरुवातीला त्याने तिच्यासोबत शाब्दिक वाद घातला. तसंच तिच्या पतीला आणि मुलालाही मारहाण केली. शिवाय तिचे केस पकडून तिच्यावरही हात उगारला. तिने त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. पण या झटापटीत त्याने तिला गोळ्या घातल्या. आरोपी सोमपाल याने आपल्या घरी काम करणाऱ्या 35 वर्षीय महिलेची गोळ्या घालून हत्या केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक अरुण कुमार सिंह यांनी दिली. त्याने तिच्या मुलीवरही प्राणघातक हल्ला केला. त्यात ती जखमी झाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील कारवाई करण्यात येत असल्याचंही अरुण कुमार यांनी सांगितलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    पुढील बातम्या