Home /News /crime /

काय सांगता! कोब्राच्या मृत्यूप्रकरणी अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

काय सांगता! कोब्राच्या मृत्यूप्रकरणी अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

एका सापाच्या मृत्यूप्रकरणी अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाने अभियंता केव्ही विजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे

    नवी दिल्ली 09 डिसेंबर : हत्या, चोरी, बलात्कार किंवा इतरही अनेक घटनांमध्ये दोषींविरोधात गुन्हा दाखल झाल्याचं किंवा शिक्षा झाल्याचं तुम्ही आजवर अनेकदा ऐकलं असेल. त्यामुळे, यात नवल असं काहीच नाही. मात्र, आता एक अतिशय वेगळं प्रकरण समोर आलं आहे. यात एका सापाच्या मृत्यूप्रकरणी अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाने अभियंता के.व्ही विजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे (Case Against Engineer for not Rescuing Cobra). ही घटना कर्नाटकमधील आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊया. हेही वाचा - बनावट फेसबुक अकाउंट उघडून कुणी तुम्हाला ‘असा’ त्रास देत नाही ना? स्मार्ट सिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने नुकतंच शहरातील सागर रोडजवळील अनधिकृत अंजनेय मंदिर पाडण्याचं काम सुरू केलं आहे. यादरम्यान पथकाकडून हे काम सुरू असताना यात एका कोब्रा सापाचा मृत्यू झाला आहे (Cobra Killed During Demolition Drive). याच विरोधात आवाज उठवत वनविभागाने अभियंता केव्ही विजय कुमार यांच्यावर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा - कोर्टाच्या इमारतीतून महिलेला फेकलं, गंभीर जखमी; 12 जणांवर गुन्हा शंकरा वन परिक्षेत्रातील सूत्रांनी सांगितले की, स्मार्ट सिटी मिशनच्या अधिकाऱ्यांनी शहरातील विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी अनेक बांधकामे जमीनदोस्त करण्याची मोहीम राबवली. ही मोहीम सुरू असतानाच मंदिराजवळ एक कोब्रा दिसला. मात्र, याबद्दल वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्याऐवजी किंवा त्याच्या बचावासाठी पाऊले उचलण्याऐवजी अभियंत्याने मोहीम सुरूच ठेवली. यातच कोब्रा सापाचा मृत्यू झाला.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, King cobra

    पुढील बातम्या