मेरठ, 19 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील (Uttar pradesh) मेरठ येथे पतीकडून धोका आणि पैशांची उधळण करण्याच्या सवयीमुळे संतापलेल्या पत्नीने आपल्या आईच्या मदतीने पतीचा काटा काढला. मेरठ पोलिसांनी या प्रकरणात पत्नी, तिची आई आणि 5 लोकांना अटक केली आहे. मेरठ येथील टिकरी गावात राहणारे परविंदर व्यवसायाने शेतकरी होते आणि आवड म्हणून जादू-टोण्याचं काम करीत होते. यामुळे त्यांची अनेक महिलांसोबत ओळख झाली होती. आरोपी पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, तिचा पती गैर महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवत होता आणि या दरम्यान त्यांचे सेक्स व्हिडीओ शूट करण्यासाठी जबरदस्ती करीत होता. (Forcing wife to shoot sex VIDEO while having sex with another women)
याला जर पत्नीने नकार दिला तर तिला अत्यंत वाईट वागणूक देत होता. पतीच्या या कृत्यामुळे त्रासलेली पत्नी त्याला सोडून निघून गेली होती. मात्र त्यानंतर पत्नी 2 महिन्यांपूर्वी पुन्हा पतीसोबत राहण्यासाठी आली होती. मात्र तरीही पतीच्या वागणुकीत बदल झाला नाही. त्यानंतर मात्र पत्नीने पतीच्या हत्येचं कारस्थान रचलं.
हे ही वाचा-Love Jihad संबंधी कायद्यातल्या काही कलमांवर हायकोर्टाचे निर्बंध
आईसोबत मिळून पतीच्या हत्येचं कारस्थान रचलं
हत्येसाठी पत्नीने आपल्या आईची मदत घेतली. महिलेच्या आईने लांबच्या नातेवाईकांच्या मदतीने बागपतमधील गुंडांना 1 लाख रुपयांची सुपारी दिली आणि हत्येचं कारस्थान रचलं. गुंडानी रेकी करून आधी सराव केला आणि त्यानंतर पत्नी बबलीने पतीचं लोकेशन सांगितलं. यानंतर हल्लेखोरांनी परविंदर याला गोळी घालून त्याची हत्या केली. हत्येची घटना घडल्यानंतर घरात शोककळा पसरली. हत्येचं कारस्थान रचणारी बबली स्वत: पीडित असल्याचं दाखवून हत्यारांच्या अटकेची मागणी करू लागली. पोलिसांच्या तपासानंतर या घटनेचा उलगडा झाला. या प्रकरणात आरोपी पत्नी बबली, तिच्या आईसह आकाश विनीत आणि शुभम यांना अटक केली आहे. त्यानंतरही पत्नीला आपण केल्या कृत्याबाबत किंचितही निराशा नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Murder, Wife and husband