कोटा, 21 फेब्रुवारी: अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने लग्न करून तिचं सलग 3 वर्ष लैंगिक शोषण (Sexual Assault) केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी एवढ्यावर थांबला नाही, तर त्याने आपल्या अल्पवयीन पत्नीला आपल्या वडिलांशीही लैंगिक संबंध (Sexual Relation) ठेवण्यास भाग पाडलं आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 2017 साली पीडित मुलीचं एक मध्यमवयीन व्यक्तीशी लग्न झालं होतं. त्यावेळी तिच्या वडिलांचं नुकतचं निधन झालं होतं, तर तिची आई सतत आजारी होती. त्यामुळे तिच्या दोन्ही आत्यांनी तिचं जबरदस्तीने लग्न लावून दिलं होतं. पीडितेनं याचा विरोध केला असता, तिला आरोपी सुनिलने घरात डांबून ठेवलं आणि तिचं लैंगिक शोषणही केलं.
पीडित मुलीने 3 वर्ष पतीचा छळ सहन केला
सलग 3 वर्ष घरात कैद राहिल्यानंतर, आजोबांच्या निधनाच्या निमित्ताने पीडितेची आरोपी सुनीलच्या तावडीतून सुटका झाली. त्यानंतर तिने मध्य प्रदेशातील झाशी येथे पतिविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर कोटा पोलिसांनी आरोपीला पकडून झांसी पोलिसांच्या हवाली केलं आहे.
(वाचा -हृदय पिळवटून टाकणारी घटना! 5 वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करुन बलात्कार)
आरोपी पतीने क्रौर्याच्या सर्व परीसीमा ओलांडल्या
आरोपी सुनीलने पीडित मुलीला गेल्या तीन वर्षांपासून सतत घरात कैद करून ठेवलं होतं. त्याने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. इतकंच नाही, तर त्याने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडत, अल्पवयीन पत्नीला आपल्या पित्याशीच शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं आहे. नकार दिल्यानंतर तिला अनेकदा मारहाणही करण्यात आली. गेल्या 3 वर्षांपासून नरकयातना भोगणारी पीडित युवती आपल्या आजोबांच्या मृत्यूमुळे गावात आली होती. यावेळी तिने आपल्यासोबत सुरू असलेल्या अत्याचाराची कहाणी आपल्या भावाला सांगितली. त्यानंतर पीडितेनं झांसी पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
(वाचा -धक्कादायक! नोकरीचं आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार; एका महिलेसह 4 जणांना अटक)
या प्रकरणी, झांसी पोलिसांनी पतीविरोधात कैद करून ठेवणं, बलात्कार आणि छळ केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर आरोपीच्या वडिलांसह पीडितेच्या दोन्ही आत्यांविरोधातही खटला दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी केवळ आरोपी सुनीलला अटक केली असून घटनेचा तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Rajsthan, Rape, Sexual assault