मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /ख्रिसमसच्या दिवशी गेला गर्लफ्रेंडला भेटायला, गावकऱ्यांनी लावून दिलं लग्न

ख्रिसमसच्या दिवशी गेला गर्लफ्रेंडला भेटायला, गावकऱ्यांनी लावून दिलं लग्न

अल्पवयीन तरुण आणि तरुणी एकमेकांना भेटतात याचा राग मनात धरून ग्रामस्थांनी दोघांचं जबरदस्तीनं लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

अल्पवयीन तरुण आणि तरुणी एकमेकांना भेटतात याचा राग मनात धरून ग्रामस्थांनी दोघांचं जबरदस्तीनं लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

अल्पवयीन तरुण आणि तरुणी एकमेकांना भेटतात याचा राग मनात धरून ग्रामस्थांनी दोघांचं जबरदस्तीनं लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.

पटना, 27 डिसेंबर: ख्रिसमसच्या (Chiristmas) दिवशी आपल्या प्रेयसीला (Girlfriend) भेटायला गेलेल्या अल्पवयीन तरुणाचं (Minor boy) गावकऱ्यांनी जबरदस्तीनं लग्न (Forceful marriage) लावून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या क्लासमध्ये शिकणाऱ्या मुलीसोबत ओळख झाल्यानंतर तरुण तिला भेटायला जात असे. मात्र गावकऱ्यांना ही बाब मान्य नव्हती. त्यामुळे गावकऱ्यांनी भेटायला आलेल्या तरुणाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं जबरदस्तीनं लग्न लावून दिलं. 

अशी घडली घटना

बिहारमधील परशुरामपूर गावात एक अल्पवयीन मुलगा त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी पोहोचला. ते दोघंही एकाच वर्गात होते आणि एकाच कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेत होते. कोचिंग क्लासमध्येच दोघांची ओळख झाली होती आणि त्याचं रुपांतर मैत्रीत आणि प्रेमात झालं होतं. त्यानंतर हा तरुण वरचेवर गावात येऊन तरुणीला भेटत असे आणि गप्पा मारत असे. मात्र गावकऱ्यांना ही बाब मान्य नव्हती आणि त्यांना दोघांचं अशा प्रकारे भेटणं डोळ्यात खुपत होतं. 

दोघांचं लावलं लग्न

घटनेच्या दिवशी तरुणीला भेटायला आलेल्या तरुणाला गावकऱ्यांनी पकडलं आणि सर्व ग्रामस्थ एका ठिकाणी गोळा झाले. दोघांना गावातील मंदिरात नेण्यात आलं आणि तिथं त्यांचं जबरदस्तीनं लग्न लावण्यात आलं. दोघंही अल्पवयीन आहेत, याचा विचारही ग्रामस्थांनी केला नाही. आपल्याला सोडून देण्याची विनंती तरुण वारंवार करत राहिला, मात्र ग्रामस्थ काहीही ऐकायच्या मूडमध्ये नव्हते. 

हे वाचा -

घरच्यांनी घेतला आक्षेप

अशा प्रकारे अल्पवयीन मुलांचं लग्न लावून देण्याच्या ग्रामस्थांच्या कृत्याचा दोघांच्याही घरच्यांनी निषेध केला आहे. ग्रामस्थांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अल्पवयीन मुलांचं अपहरण करून जबरदस्तीनं लग्न लावून दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Couple, Crime, Marriage