मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

भयंकर! बापाने स्वत:च्याच मुलाचा मृतदेह 17 दिवस ठेवला डीप फ्रीजरमध्ये

भयंकर! बापाने स्वत:च्याच मुलाचा मृतदेह 17 दिवस ठेवला डीप फ्रीजरमध्ये

शेवटी वडिलांनीच असं का केलं, यामागील कारण सांगितलं.

शेवटी वडिलांनीच असं का केलं, यामागील कारण सांगितलं.

शेवटी वडिलांनीच असं का केलं, यामागील कारण सांगितलं.

  • Published by:  Meenal Gangurde
सुल्तानपुर, 18 ऑगस्ट : दिल्लीत (Delhi) काही दिवसांपूर्वी शिवांक पाठक (32) या तरुणाची गूढपणे मृत्यू झाला होता. तो उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुल्तानपूर येथील राहणारा होता. शिवांकच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी तब्बल 17 दिवस त्याचा मृतदेह डीप फ्रीजरमध्ये प्रिजर्व करून घरातच ठेवला. त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे की, त्यांच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. मात्र जेव्हा ते पोलीस ठाण्यात गेले तेव्हा कोणताही गुन्हा दाखल केला नाही. या सर्व प्रकारानंतर तरुणाच्या वडिलांनी कोर्टा याचिका दाखल करीत एफआयआर दाखल करण्याची विनंती केली आहे. ( The father kept his sons body in the deep freezer for 17 days) 2013 मध्ये गुलीन कौरशी केलं होतं लग्न शिव प्रसाद पाठक सेनातून रिटायर्ड आहेत. त्यांचा मोठा मुलगा शिवांक 2012 मध्ये दिल्लीला गेला होता. तेथे एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करीत होता. यादरम्यान त्याने एका अन्य व्यक्तीसोबत मिळून एक कंपनी सुरू केली. कंपनीत एचआर म्हणून नोकरी करीत असलेल्या तरुणीसोबत शिवांकमे 2013 मध्ये लग्न केलं. वडिलांचा आरोप आहे की, तरुणीने लाखोंची संपत्ती स्वत:च्या नावावर केली आहे. त्यानंतर ती शिवांकवर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न करीत होती. वडिलांचा आरोप आहे की, 19 जुलै 2021 रोजी शिवांके आपला लहान भाऊ इशांकला फोन करुन आपल्या हत्येची भीती व्यक्त केली होती. तो म्हणाला होता की, त्याची हत्या केली जाऊ शकते. किंवा कोणत्या गुन्हेगारीत अडकवलं जाऊ शकतं. या संवादाचं रेकॉर्डिंग इशांकच्या मोबाइलमध्ये आहे. हे ही वाचा-बोअरवेलचं बटण दाबलं अन् होत्याचं नव्हतं झालं; विजेच्या धक्क्याने मुलीचा मृत्यू गुरलीनने सांगितलं की शिवांग बेशुद्ध झालं रेल्वेत नोकरी करणारा इशांक लखऊनमध्ये तैनात आहे. तो म्हणाला की, शिवांकची पत्नी आणि माझी वहिनी गुलरीन कौरने दिल्लीतील मोतीनगर भागात राहणारी माझी बहीण पुनम मिश्रा हिला करुन सांगितलं की, शिवांक बेशुद्ध झाला आहे. त्याचं शरीर पिवडं पडलं आहे. ते तिथं पोहोचले आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं, यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घो।षित केलं. पोस्टमार्टम रिपोर्ट न दिल्याचा आरोप शिवांगच्या वडिलांनी सांगितलं की, 1 ऑगस्ट रोजी त्यांना मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाली. हा मृत्यू संशयास्पद आहे. ते म्हणाले की, जोपर्यंत हे प्रकरण पोलिसात दाखल केलं जात नाही, तोपर्यंत ते मुलावर अंत्यसंस्कार करणार नाही. शिवांगच्या मृत्यू प्रकरणात प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली नाही, इतकच नाही तर त्याचा पोस्टमार्टम रिपोर्टही देण्यात आला नाही.
First published:

Tags: Crime news, Murder

पुढील बातम्या