Home /News /crime /

9 कोटींच्या सोन्यासाठी 5 तरुणांनी Money Heist स्टाइल घातला दरोडा, मात्र सायरन वाजला आणि...

9 कोटींच्या सोन्यासाठी 5 तरुणांनी Money Heist स्टाइल घातला दरोडा, मात्र सायरन वाजला आणि...

आजच मनी हाइस्टचा (Money Heist) पाचवा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

    राजस्थान, 3 सप्टेंबर : अलवर (Alvar News) शहरात मुथूट फायनान्स कंपनीत भरदिवसा दरोड्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी कार्यालय सुरू होताच हत्यारं घेऊन दरोडेखोर कार्यालयात घुसले. त्यांनी बंदुकीच्या जोरावर 5 कर्मचारी आणि गार्डला ताब्यात घेतलं. कंपनीत 9 कोटी रुपयांचं सोनं ठेवलं होतं. कर्मचाऱ्याच्या सावधानतेमुळे हे 9 कोटींचं सोनं सुखरुप आहे. (For 9 crores of gold 5 youths wore Money Heist style robbery but the siren sounded) बाईकवरुन आले होते दरोडोखोर मुथूट फायनान्स कंपनीचं कार्यालय सकाळी साधारण 10 वाजता उघडलं. कार्यालय उघडताच बाइकवरुन आलेले 2 दरोडेखोर आधार कार्ड दाखवून आता शिरले. त्यांनी रजिस्टरमध्ये एन्ट्रीदेखील केली. आत शिरताच बंदुक दाखवून त्यांनी सर्वांना ताब्यात घेतलं. त्यांच्यामागून दुसऱ्या बाईकवरुन 3 आणखी दरोडेखोर आले होते. हे ही वाचा-उद्यापासून 4 दिवस पुण्याला झोडपणार पाऊस; आज 15 जिल्ह्यांना हाय अलर्ट मागत होते लॉकरची किल्ली कर्मचारी मोनिका गोयलने सांगितलं की, त्यांना डोक्यावर बंदुक ठेवली. सर्व कर्मचारी कार्यालयात आले होते. कार्यालय आताच सुरू झाल्याने ग्राहक अजूनपर्यंत आले नव्हते. दरोडेखोर आता येऊन मारहाण करू लागले. यामुळे सर्वजण खूप घाबरले होते. त्यांना लॉकरची किल्ली हवी होती. मात्र कोणीच त्यांना किल्ली देत नव्हतं. तेव्हा एका कर्मचाऱ्याने सायरन वाजवला. सायरन बंद होत नसल्याने दरोडेखोर घाबरले. जात असताना त्यांनी बंदुकीने गार्ड आणि स्टाफच्या डोक्यावर मारहाण केली. यानंतर ते फरार झाले. मिळालेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी मुथूड फायनान्स कंपनीत प्रवेश केला. सुरुवातील दोघेच आत शिरले होते. थोड्या वेळाने आणखी तिघे जण कार्यालयात शिरले आणि कर्मचाऱ्यांना दम भरू लागले. यादरम्यान एका कर्मचाऱ्याने सावधपणे स्वत:ला एका खोलीत बंद केलं आणि सायरन वाजवला. सायरनचा आवाज ऐकताच दरोडेखोर घाबरले आणि तेथून फरार झाले. जात असताना त्यांनी गार्ड आणि दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सूचना मिळताच जवळी पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Robbery

    पुढील बातम्या