जम्मू : 21 जानेवारी : जम्मु आणि काश्मीरमधील कठुआमधील बिल्लावर भागात एक भीषण अपघात झाला आहे. ही घटना धनू पारोळे गावात झाली. काल रात्री अचानक झालेल्या भीषण अपघातात 5 जणांना जीव गमवावा लागला आहे तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीसांनी बचावकार्य सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जम्मु आणि काश्मीरमधील कठुआमधील बिल्लावर भागात एक भीषण अपघात झाला आहे. ही घटना धनू पारोळे गावात झाली.
J&K | Five people killed, 15 injured after their passenger vehicle fell into a deep gorge at Dhanu Parole village in Billawer area in Kathua last night: Police Control Room, Kathua pic.twitter.com/fFb7paSN0j
— ANI (@ANI) January 21, 2023
काल रात्री अचानक झालेल्या भीषण अपघातात 5 जणांना जीव गमवावा लागला आहे तर 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीसांनी बचावकार्य सुरू केले आहे. कार दरीत कोसळल्याने ही घटना झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौगहून डन्नू पॅरोलला घेऊन जाणारे वाहन सिला येथे खाली आल्यानंतर खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. या अपघातात सुरुवातीला चार जण ठार झाले तर पाचव्या व्यक्तीचा काही काळानंतर मृत्यू झाला. दरम्यान 15 जखमींना बिल्लावर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बंटू, हंस राज, अजित सिंग, अमरू आणि काकू राम अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बिल्लावर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Jammu and kashmir, Major accident