पतीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात 5 महिन्यांच्या गर्भवतीनं इमारतीवरून मारली उडी

पतीसोबत झालं भांडण, रागाच्या भरात 5 महिन्यांच्या गर्भवतीनं इमारतीवरून मारली उडी

पाच महिन्यांच्या एका गर्भवती महिलेनं इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : पाच महिन्यांच्या एका  गर्भवती महिलेनं इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पतीसोबत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात या गर्भवतीनं इमारतीवरून खाली उडी मारली आणि आपलं आयुष्य संपवलं. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेचा पती गोविंदला बेड्या ठोकल्या आहेत. राजधानी दिल्लीतील रोहिणी परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव संगीता असे आहे. घराच्या गॅलरीतून उडी मारून तिनं आपली जीवनयात्रा संपवली. गंभीर जखमी झालेल्या महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

(वाचा : '...या लोकांची लायकी नाही',पंकजा मुंडेंचं अजित पवार-धनंजय मुंडेंवर टीकास्त्र)

हुंड्यासाठी छळल्याचा आरोप

दरम्यान, हुंड्यासाठी संगीताचा छळ केला गेला, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वीही संगीताचं तिच्या पतीसोबत वाद झाला होता. पण घटनास्थळी पोलिसांनी सुसाईड किंवा आणखी काहीही ठोस पुरावा आढळून आलेले नाही. 2018मध्येच संगीता आणि गोविंदचं लग्न झालं होतं.

(वाचा : इमारतीवरून उडी मारून तरुणीची आत्महत्या,बॉलिवूडमध्ये करायचं होतं करिअर; पण...)

मुंबईमध्येही एका 25 वर्षीय तरुणीनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ओशिवरातील लोखंडवाला कॉम्प्लेक्स या उच्चभ्रू परिसरातील केन वुड नावाच्या इमारतीतील ही धक्कादायक घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पर्ल पंजाबी असं आत्महत्या करण्याऱ्या तरुणीचं नाव आहे. पर्ल बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत आपलं नशीब आजमावू पाहत होती. यासाठी तिनं अनेकदा प्रयत्नदेखील केले. पण तिच्या प्रयत्नांना हवे तसं यश मिळू शकलं नाही. बॉलिवूडमध्ये करिअर होऊ न शकल्यानं सध्या ती कोणत्यातरी खासगी कंपनीत नोकरी करत होती. तर दुसरीकडे पर्ल आणि तिच्या आईमध्ये वारंवार वाद होत असत, अशीही माहिती समोर आली आहे.

(वाचा : दोन दिग्गज नेत्यांनी सोडली होती शिवसेना, आता एक शिवसेना तर दुसरा जाणार भाजपमध्ये)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्लचं मानसिक आरोग्य चांगलं नव्हतं. यापूर्वीही तिनं दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पण गुरुवारी अखेर तिनं तिचं आयुष्य संपवलं. गुरुवारी (29 ऑगस्ट) रात्री उशिरा 12.30 वाजण्याच्या सुमारास पर्लचे घरातल्यांसोबत कोणत्या तरी कारणावरून वाद झाला आणि रागाच्या भरात तिनं इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. गंभीर स्वरुपात जखमी झालेल्या पर्लला तातडीनं कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. ओशिवरा पोलीस या प्रकरणाची सध्या कसून चौकशी करत आहेत.

बाळासाहेबांच्या फटकाऱ्याने दिलीप सोपल घायाळ, 'तो' VIDEO व्हायरल

Published by: Akshay Shitole
First published: August 30, 2019, 10:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading