Home /News /crime /

एकाच कुटुंबातील पाचजणं राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

एकाच कुटुंबातील पाचजणं राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

Representative Image

Representative Image

कुटुंब प्रमुख आपल्या घराजवळ एक छोटसं हॉटेल चालवत होता. नुकतच त्याने एक घरही खरेदी केलं होतं.

    तिरुवनंतपूरम, 2 जुलै : केरळमधून (Keral News) थरकाप उडवणारा प्रकार समोर आला आहे. येथील तिरुवनंतपुरमजवळील कल्लम्बलम भागात एकाच कुटुंबातील पाच जणं घरात मृतावस्थेत (Family 5 member death) आढळले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमधील पाच पैकी दोघे अल्पवयीन आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, घराचा मालक एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढलला. तर चौघेजणं दुसऱ्या खोलीत होते. पोलिसांना सूचना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या हत्येच्या कारणाचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतांनी विषारी पदार्थाचं सेवन केलं होतं. मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांची दोन मुलं आणि अन्य महिला नातेवाईकाचाही समावेश आहे. पोलिसांकडून या प्रकरणात तपास केला जात आहे. आत्महत्येमागे कर्जाचं कारण असू शकतं... पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आर्थिक चणचण असल्यामुळे कुटुंब गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होतं. त्यामुळे कर्जाच्या तणावातून कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची शक्यता आहे. मात्र काही दिवसांपूर्वी कुटुंबाने एक घर खरेदी केलं होतं. मृत कुटुंबातील प्रमुखाचं नाव मणिकुट्टन आहे. मित्र आणि नातेवाईकांनी सांगितलं की, मणिकुट्टन कर्जामुळे तणावात होता. तो आपल्या घराजवळ एक छोटसं हॉटेल चालवत होता. नुकतच त्याने एक घरही खरेदी केलं होतं. हॉटेलवर खाद्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलं होतं निरीक्षण मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी खाद्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी हॉटेलचं निरीक्षण केलं होतं. आणि त्यांनी मणिकुट्टनवर 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. यानंतर काही काळासाठी हॉटेल बंद करण्यात आलं होतं. शेजारच्यांनी सांगितलं की, मणिकुट्टनने शनिवारी आपलं हॉटेल पुन्हा उघडण्यासाठी सर्व व्यवस्था केली होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Kerala, Suicide

    पुढील बातम्या