• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • आधी दोन्ही चिमुरड्यांची हत्या, मग पत्नीवर हातोडीने वार; इमारतीवरुन उडी मारून पतीची आत्महत्या

आधी दोन्ही चिमुरड्यांची हत्या, मग पत्नीवर हातोडीने वार; इमारतीवरुन उडी मारून पतीची आत्महत्या

आर्थिक अडचणीतून ही सुसाइड करण्यात आलेली नाही. या घटनेमागील कारण वाचून तुम्हालाही धक्का बसले.

 • Share this:
  रायपूर, 1 नोव्हेंबर : छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील नया रायपूरमध्ये एक अत्यंत धक्कादायक (Raipur, the capital of Chhattisgarh) वृत्त समोर आलं आहे. या भागातील पंचायत विभागचे पदस्य झंकार भास्कर यांनी सेक्टर 27 येथील इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या (Family Suicide) केली. आत्महत्या करण्यापूर्वी मध्यरात्री 7 वर्षीय मुलगी आणि 3 वर्षीय मुलासह पत्नी सुक्रियावर हातोडीने हल्ला केला. यानंतर तिघांचा मृत्यू झाल्याचं समजून इमारतीवरुन उडी मारली. या प्रकारानंतर शेजारच्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी गंभीर अवस्थेत झंकारच्या पत्नीला रुग्णालयात दाखल केलं. (First killing both Children then hitting his wife with a hammer Husband commits suicide by jumping from a building ) चार पानी सुसाइड नोट सापडली.. राखी पोलिसांना या प्रकरणात चार पानी सुसाइड नोट सापडली आहे. या सुसाइड नोटमध्ये तब्बल एक महिन्यापूर्वी रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या संतोष कंबर याच्या मृतदेहाचा उल्लेख करण्यात आला आहे. सुसाइड नोटमध्ये संतोष कंबरच्या मृत्यूचा उल्लेख करीत झंकार भास्करने लिहिलं आहे की, माझ्या भावाने आपल्या पत्नीची हत्या केली. यात माझी चूक काय? वारंवार त्यावरुन मला टोमणे दिले जातात. वारंवार खुनी कुटुंब असल्याचं म्हटलं जातं. आज पुन्हा तेच झालं. पुढे झंकारने लिहिलं की, मला माझ्या मुलांना मारायचं नव्हतं. मात्र विना आई-वडिलांच्या मुलांचं जीवन कसं असतं याचा विचार करून त्यांनाही मारून टाकलं. यासाठी मला माफ करा. हिंदुस्तानने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. हे ही वाचा-मदरशाच्या क्लासरुममध्ये मुलीवर बलात्कार? मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ रात 2.30 वाजेदरम्यान घडला प्रकार पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही हृदय विदारक घटना रात्री 2:30 ते 3 दरम्यान झाली. काहीतरी पडल्याचं आवाज आल्याने शेजारी उठले. यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावलं. घराच्या आत दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. तर झंकारच्या पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. झंकारचा मृतदेह इमारतीच्या खाली पडला होता. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: