मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

व्यापाऱ्यावर भर बाजारपेठेत गोळीबार, हल्ल्याच्या दहशतीने मार्केट बंद

व्यापाऱ्यावर भर बाजारपेठेत गोळीबार, हल्ल्याच्या दहशतीने मार्केट बंद

आपल्या दुकानात बसून (Firing on a businessman by two unidentified persons on bike) व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

हमेरठ, 21 नोव्हेंबर: आपल्या दुकानात बसून (Firing on a businessman by two unidentified persons on bike) व्यवसाय करणाऱ्या एका व्यापाऱ्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात बसून रोजचा व्यवसाय (Firing by bikers) ते करत असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. त्यातील एक गोळी त्यांच्या छातीत घुसली. हे पाहून व्यापारी (Markets closed after firing incidence) आक्रमक झाले आणि त्यांनी मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला.

अशी घ़डली घटना

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पुनीत जैन हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करतात. वर्धमान कॉपी सेंटर नावाचं त्यांचं दुकान आहे. मधु मार्केट परिसरातील दुकानात ते व्यवसाय करत असताना अचानक दोन हल्लेखोर बाईकवरून आले. त्यांच्या हातात बंदूक होती. ते दुकानापाशी आले आणि क्षणार्धात पुनीत यांच्या दिशेनं त्यांनी गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी पुनीत यांच्या थेट छातीत घुसली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. हल्ला केल्यावर हल्लेखोर गर्दीचा फायदा घेत तिथून पळून गेले.

पुनीत यांच्यावर उपचार सुरू

गोळीबारानंतर गंभीर जखमी झालेल्या पुनीत यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तातडीनं उपचार मिळाल्यामुळे त्यांचा जीव वाचला जीवाला असणारा धोका टळल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

व्यापारी आक्रमक

ही घटना समजताच आजूबाजूचे व्यापारी एकत्र जमले आणि त्यांनी बाजारपेठ बंद ठेवण्याची घोषणा केली. दिवसाढवळ्या व्यापाऱ्यांवर खुनी हल्ले होत असून व्यापारी सुरक्षित नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. पोलिसांनी तातडीने तपास करत खुनाचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक करावी आणि व्यापाऱ्यांच्या सुरक्षेची हमी घ्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांच्या संघटनेनं केली आहे. त्यासाठी तूर्तास मार्केट बंद ठेवण्यात आलं आहे.

हे वाचा- Terrible! नाराज Girlfriend ने Boyfriend वर केला अ‍ॅसिड हल्ला

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. या परिसरातील वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

First published:

Tags: Business, Crime, Gun firing, Rajasthan