थरार...विरार मध्ये मोबाईल शॉपमध्ये गोळीबार, दोन जखमी

थरार...विरार मध्ये मोबाईल शॉपमध्ये गोळीबार, दोन जखमी

रात्री दुकान बंद करण्याची तयारी सुरू असताना काही लोक या दुकानात आले. त्यानंतर ते वाद घालू लागले आणि त्यांनी पिस्तुल काढून थेट गोळीबारच केला.

  • Share this:

विजय देसाई, विरार 15 डिसेंबर : विरारमध्ये रविवारी रात्री एका मोबाईल शॉपमध्ये झालेल्या घटनेने खळबळ उडालीय. काही लोकांनी दुकानात येवून गोळीबार केला. त्यात दोन जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. विरार पूर्व कुंभारपाडा येथील ही घटना आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीय. हा गोळीबार चोरी करण्याच्या उद्देशानं केला की पूर्व वैमनस्यातून केला हे अद्याप स्पष्ट झाले नसून विरार पोलीस तपास करीत आहेत. रात्री दुकान बंद करण्याची तयारी सुरू असताना काही लोक या दुकानात आले आणि त्यांनी मोबाईल फोनची माहिती विचारली. त्यानंतर ते वाद घालू लागले आणि त्यांनी पिस्तुल काढून थेट गोळीबारच केला. अचानक झालेल्या या गोळीबाराने सगळेच हादरून गेले. नंतर हल्लेखोर पसार झाले होती. नंतर त्यातल्या एकाला पोलिसांनी अटक केली. तर जखमी झालेल्या दोघांवर दवाखाण्यात उपचार सुरू आहेत.

अमेरिकेहून आलेल्या सूनेची झोपेतच हत्या, सासूने डोक्यात घातला फ्लॉवर पॉट

विरारमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या आधीही अशा प्रकारच्या घटना घडल्या होत्या. देशभरातू कामगार वर्ग विरार आणि त्या परिसरात राहण्यासाठी येत असतो. यात उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या लोकांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर अवैध शस्त्रास्त्र या परिसरात सापडली आहेत. मात्र ज्या प्रमाणात पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे किंवा धाक ठेवायला पाहिजे तेवढा वचक पोलिसांचा नाही असं मतही व्यक्त होत आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 15, 2019 11:50 PM IST

ताज्या बातम्या