जनता कर्फ्यू असताना पतीने रचला पत्नीला ठार करण्याचा प्लान, मित्रांनाच दिली सुपारी

जनता कर्फ्यू असताना पतीने रचला पत्नीला ठार करण्याचा प्लान, मित्रांनाच दिली सुपारी

आरोपी गोल्डन कलरच्या कारमध्ये आला असल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबारानंतर ज्यांनी पळ काढला.

  • Share this:

जयपूर, 22 मार्च : देशात कोरोना व्हायरसचा हाहाकार सुरू आहे. यावर मात करण्यासाठी आज संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. पण अशात गोळीबाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी जनता कर्फ्यूच्या वेळी रामपुरिया परिसरात गोळीबार करण्यात आला आहे. ज्यामध्ये एका महिलाचा मृत्यू झाला आहे. या बातमीमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गोल्डन कलरच्या कारमध्ये आला असल्याचे सांगण्यात येत आहे. गोळीबारानंतर ज्यांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तर पोलिसांनी घटनास्थळावरून मृत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

हे वाचा - जनता कर्फ्यू मोडून घराबाहेर पडणाऱ्यांना पुण्यात पोलिसांनी दिली अजब शिक्षा

महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा नवरा रामलाल मीणा याला ताब्यात घेतले आहे. ज्याला दारू पिण्याची सवय आहे. पत्नीने दारू पिण्यासाठी थांबवल्यानंतर आरोपीने त्याच्या मित्रांना हाताशी घेऊन पत्नीला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या मित्रांनी तिच्यावर अत्याचार केले आणि त्यानंतर तिच्या गोळीबार केला. सध्या आरोपींना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले आहे. त्याचबरोबर गोळीबार करणाऱ्या तरूणांचा शोधही घेण्यात येत आहे.

हे वाचा - महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला, काही तासांत मुंबई-पुण्यात 10 नवे रुग्ण

आजच्या दिवशी संपूर्ण देशात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यामध्ये कोणी एखाद्याच्या हत्येचा सापळा रचेल याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. पण असा प्रकार जयपूरमध्ये समोर आला आहे. पोलीस सध्या आरोपी पतीची कसून चौकशी करत असून परिसरातील सीसीटीव्ही इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी तपासण्यात येत आहेत. तर आरोपींकडे बंदूक आली कशी याचाही तपास सुरू आहे. या सगळ्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

हे वाचा - सगळ्यात मोठी बातमी, मुंबई-पुण्यावरून जाणाऱ्या 3000 प्रवाशांची ट्रेन रोखली

First published: March 22, 2020, 2:14 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading