मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Shocking Video : अमेरिकेप्रमाणे भारतातही फायरिंग; सायको किलरने 40 मिनिटांत 10 जणांवर गोळी झाडली

Shocking Video : अमेरिकेप्रमाणे भारतातही फायरिंग; सायको किलरने 40 मिनिटांत 10 जणांवर गोळी झाडली

या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

बेगूसराय, 13 सप्टेंबर : अमेरिकेत काही दिवसांपूर्वी लहान मुलांवर गोळीबार केल्याच्या घटनेने देश हादरला होता. त्याच्या काही दिवसात आता भारतातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. बिहारच्या बेगूसराय जिल्ह्यात एका सायको किलरने बाईकवरुन फिरत असताना बेछूट गोळीबार केला. या सायको किलरने 10 जणांवर गोळीबार केला आहे.

या घटनेत 9 जणं जखमी झाले आहेत तर गोळी लागल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी बाईकवर फिरत असताना दोन आरोपींना अंधाधुंद गोळीबार केला आणि 10 जणांवर गोळी झाडली.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हैराण करणारी गोष्ट म्हणजे, तब्बल 40 मिनिटांपर्यंत आरोपी विविध ठिकाणांवर फायरिंग करीत होते. मात्र पोलिसांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही.

आरोपींना तब्बल चार पोलीस ठाणे हद्दीत 40 मिनिटांपर्यंत गोळीबार केला. या आरोपींनी ठिकठिकाणी गोळीबार करीत गोंधळ घातला. सध्या 9 जणं जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

First published:

Tags: Bihar, Crime, Gun firing