Home /News /crime /

दुचाकीवरून जाताना पोलिसाने काठीने मारले, जाब विचारला तर केली अमानुष मारहाण

दुचाकीवरून जाताना पोलिसाने काठीने मारले, जाब विचारला तर केली अमानुष मारहाण

दुचाकीवरून जाणाऱ्या वाहन चालकास पोलीस उपनिरीक्षक शिवराज हाळे यांनी काठीने मारहाण केली.

    आनिस शेख, प्रतिनिधी पुणे, 16 सप्टेंबर : पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने प्रत्येक व्यक्तीला कोरोना पासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी तोंडावर मास्क लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, मास्कचा दंड आकारल्यानंतरही दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पुणे शहरातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत केईएम रुग्णालय जवळ विना मास्क असणार्‍या व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे एक पथक रविवारी सायंकाळच्या वेळेस तैनात होते. विना मास्क व्यक्तीवर कारवाई करत असताना दुचाकीवरून जाणाऱ्या वाहन चालकास पोलीस उपनिरीक्षक शिवराज हाळे यांनी काठीने मारहाण केली. अचानक झालेल्या मारहाणीने दुचाकीस्वार घाबरला तसेच पोलिसांना मारहाण संदर्भात जाब विचारला असता मास्क लावला नसल्याचे कारण देत संतापलेल्या पोलीस उपनिरीक्षक शिवराज हाळे यांनी दुचाकी स्वाराला पाठीवर, कानावर, तसेच पायावर, मारहाण केली. तसंच 500 रूपयाची दंडत्मक कारवाईही केली. अन्वर खाजाभाई तांबोळी असं  दुचाकीस्वाराचे नाव आहे. दंडात्मक कारवाईकरुन सुद्धा मारहण झाल्याने तांबोळी यांनी पोलीस उपनिरीक्षकाविरूद्ध समर्थ पोलीस ठाण्यात तक्रारीचा अर्ज दाखल केला आहे, पंरतु, या सर्व प्रकरणात पोलिसांकडून संबंधित तक्रारदारावर केवळ दंडात्मक़ कारवाई केली असून मारहाण झाली नसल्याचं पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीविरोधात न्याय मिळण्यासाठी वेळ प्रसंगी न्यायालयाचा दरवाजाही ठोठावण्याची तयारी तक्रारदाराने केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या