Home /News /crime /

मुंबईतूनच होतोय दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा, धक्कादायक माहितीसमोर

मुंबईतूनच होतोय दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा, धक्कादायक माहितीसमोर

अंमली विरोधी पथकाने गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

    मुंबई, 22 जानेवारी : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक मुंबईत ड्रग्स विकून दहशतवादाला आर्थिक पुरवठा करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंमली विरोधी पथकांनी अटक केलेल्या गँगस्टर चिंकू पठाण यांच्या चौकशीतून ही माहिती समोर आली आहे. गेल्या 5 वर्षांत तब्बल 1500 कोटींचे ड्रग्स विकले गेले आहे. अंमली विरोधी पथकाने गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. याच कारवाई दरम्यान, अंमली विरोधी पथकाने गँगस्टर चिंकू पठाणला अटक केली होती. त्याच्याकडे सापडलेल्या डायरीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. दाऊदचे हस्तक मुंबईत गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स विकून ते पैसे दाऊदला पाठवत होते. हवाला मार्गे हा पैसा पाठवला जात होता. गेल्या पाच वर्षांमध्ये या तस्कारांनी 1500 कोटींचे ड्रग्स विकले होते, हा पैसा दाऊदकडे पोहोचल्यानंतर तो दहशतवाद्यांना कारवाया करण्यासाठी पुरवत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान,  NCB पथकाचे अधिकारी समीर वानखेडेंनी आजही मोठी कारवाई केली आहे.  डोंगरी सारख्या परिसरात घुसून वानखेडे यांनी 4 ठिकाणी धाड टाकली आहे. दाऊदच्या ड्रग्स अड्ड्यांवर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. दाऊदच्या आणखी एका हस्तकला  अटक करण्यात आल्याचा दावा समीर वानखेडेंनी केला आहे. 'काही दिवसांत मुंबईतून दाऊदची ड्रग्सची दहशत संपवणार आहे. ड्रग्स तस्करी करुन दाऊदच्या हस्तकांनी कमावलेली संपत्ती जप्त करण्यात येणार आहे, अशी माहिती गायकवाड यांनी दिली. तसंच, चिंकू पठाणकडे सापडली डायरी आहे, अनेक तस्करांचे आणि सेवन करणाऱ्यांची नावे समोर आली आहे.  यामध्ये काही उद्योगपती आणि सेलिब्रिटींची नावे आहे.  NCB लवकर यांची चौकशी करणार आहे, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या