• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • आधी आर्थिक गैरव्यवहार, आता अमली पदार्थांची तस्करी; हर्षद मेहता सोबत शेअर मार्केट घोटाळा करणाऱ्या निरंजन शहाला अटक

आधी आर्थिक गैरव्यवहार, आता अमली पदार्थांची तस्करी; हर्षद मेहता सोबत शेअर मार्केट घोटाळा करणाऱ्या निरंजन शहाला अटक

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने निरंजन शहा याला दिल्लीच्या मुनेरका येथून अटक करण्यात आली आहे.

  • Share this:
मुंबई, 18 ऑगस्ट : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू युनिटने एक मोठी कारवाई केली असून यात एका हायप्रोफाईल घोटाळे बाजाला अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. या शेअर मार्केट घोटाळेबाज अमली पदार्थ तस्कराचे ( drug trafficking) नाव आहे निरंजन जयंतीलाल शहा (Niranjan Shah ). या निरंजन शहाने हर्षद मेहता सोबत मिळून शेअर मार्केट घोटाळा केला होता. त्याच्या विरुद्ध 1990 च्या सुमारास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे. आता हाच निरंजन अमली पदार्थांची तस्करी करू लागला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने सोहेल युसुफ मेमन या अमली पदार्थ तस्कराला अटक केली होती. त्याच्याकडून 5 किलो 65 ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. ज्याची बाजारातील किंमत अंदाजे 2 कोटी 53 लाख रुपये सांगितली जाते. या सोहेलच्या चौकशीत निरंजन शहा याचे नाव समोर आले होते. यानुसार महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक निरंजन शहा याला शोधत होते. पण शेअर मार्केट घोटाळेबाज निरंजन शहा सतत वेगवेगळी वेषांतर करीत होता. दहशतवादी विरोधी पथकाला निरंजन शहा हा दिल्ली येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी दिल्ली येथे त्याचा शोध घेतला. मात्र तेथे तो सापडला नाही पण तरी देखील दहशतवाद विरोधी पथकाने आशा सोडली नाही आणि निरंजन शहा याचा तपास चालू ठेवला. यादरम्यान मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरप्रदेश, हैदराबाद आणि कर्नाटक अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये निरंजन शहाला शोधण्यास दहशतवादविरोधी पथकाने जंग जंग पछाडले पण नेहमी वेषांतर करून निरंजन शहा दहशतवादविरोधी पथकाच्या हातावर तुरी देऊन पसार होत होता. हे ही वाचा-मोदी सरकारच्या योजनेच्या नावाखाली महिलांना गंडा; मुंबईत 211 जणींना लुबाडलं वेषांतर करून राहत होता निरंजन शहा शेवटी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या जुहू युनिटमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना निरंजन शहा नवी दिल्ली येथील मूनेरका या गावात एकाच साध्या खोलीत वेषांतर करून राहत होता. निरंजन शहा याचा वेषांतर इतका वेगळा होता की हा खरंच निरंजन शहा आहे का? असा प्रश्न दहशतवादी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना पडला पण निरंजन शहावर पाळत ठेवून असलेल्या दहशतवादी विरोधी पथकाच्या पोलिसांनी निरंजन शहाची सर्व बाजूने कोंडी केल्याने वेषांतर केलेला हा निरंजन शाहच होता हे उघड करण्यास दहशतवादी विरोधी पथकाच्या पोलिसांना यश आले. शेवटी निरंजन शहा दहशतवादी विरोधी पथकाच्या हाती लागला आणि त्याला दिल्ली येथे अटक करून मुंबईत आणले असून 25 ऑगस्टपर्यंत त्याला न्यायालयाने दहशतवादी विरोधी पथकाच्या कोठडीत रवानगी केली आहे. या आव्हानात्मक कामगिरीत महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाच्या जुहू युनिटचे प्रभारी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील, दशरथ विटकर, सागर कुंजीर व इतर पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. या चांगल्या कामगिरी करता दहशतवादी विरोधी पथकाचे पोलीस महासंचालक विनित अग्रवाल पोलीस उपमहानिरीक्षक शिवदीप लांडे पोलीस उपअधीक्षक सोहेल शर्मा आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीपाद काळे यांनी जुहू युनिटचे कौतुक केले असून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची ही मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. कारण निरंजन शहा हा परदेशातील अनेक मोठ्या अमली पदार्थ तस्करांच्या संपर्कात होता. यात भारतातून पळून गेलेल्या काही गुन्हेगारांचा देखील समावेश आहे असा संशय महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला आहे.
Published by:Meenal Gangurde
First published: