मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

भोंदुबाबाने मुलीवर केले लैंगिक अत्याचार, पण आईनेच दिली खोटी साक्ष!

भोंदुबाबाने मुलीवर केले लैंगिक अत्याचार, पण आईनेच दिली खोटी साक्ष!

 भगवत गीतेवर हात ठेवून ‘देवा शपथ खरे सांगेन, खोटे सांगणार नाही’ अशी शप्पथ दिली जाते. कुणी खोटी साक्ष देऊ नये यासाठी वर्षानुवर्षे न्यायालयात चालणारी ही प्रथा आहे.

भगवत गीतेवर हात ठेवून ‘देवा शपथ खरे सांगेन, खोटे सांगणार नाही’ अशी शप्पथ दिली जाते. कुणी खोटी साक्ष देऊ नये यासाठी वर्षानुवर्षे न्यायालयात चालणारी ही प्रथा आहे.

भगवत गीतेवर हात ठेवून ‘देवा शपथ खरे सांगेन, खोटे सांगणार नाही’ अशी शप्पथ दिली जाते. कुणी खोटी साक्ष देऊ नये यासाठी वर्षानुवर्षे न्यायालयात चालणारी ही प्रथा आहे.

मुंबई, 16 फेब्रुवारी : कुरार पोलीस स्टेशनमध्ये (kurar police station)  ज्या आईने आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार दिली होती. त्याच आई विरोधात कुरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तेही न्यायालयाचे आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घडलेली हकीकत अशी की, कुरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक महिला आपल्या दोन मुलींसह राहत होती. पतीने सोडल्याने त्यात हलाखीची परिस्थिती असल्याने  मिळेल ते काम करुन ही महिला घर चालवत होती. त्यात मोठी मुलगी मानसिकरित्या कमकुवत असल्याने ती बरी व्हावी याकरता या महिलेने आपल्याच घराजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीकडे उपचार सुरू केले. आपल्याकडे दैवी शक्ती असून आपण तुझ्या मुलीला ठीक करू, असं सांगून हा भोंदूबाबा पूजा अर्चा करण्याच्या बहाणे त्या मुलीवर रोज लैंगिक अत्याचार करायचा. असं काही दिवस सुरू होतं. पण एके दिवशी मुलीने त्या भोंदूबाबाकडे जाण्यास नकार दिला. याबाबत तिच्या आईने तिला कारण विचारले असता मुलीने सर्व प्रकार सांगितला.

The Burning Car: ज्या गाडीचा हप्ता भरायला जात होता तिने अचानक घेतला पेट

मुलीच्या आईला सर्व प्रकार कळाल्याने आता आपली काही खैर नाही, हे लक्षात आल्यावर तो भोंदूबाबा कर्नाटकला पळून गेला. दरम्यान, काही महिने होवूनही आपल्या विरोधात काही तक्रार दाखल करण्यात आली नाही. हे त्या भोंदूबाबाला कळताच तो पुन्हा आला आणि त्याने पुन्हा आपली भोंदूगिरी सुरू करत त्या महिलेला धमकवायला सुरुवात केली. जर त्या महिलेने आणि तिच्या मुलीने आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले नाही तर तो तंत्रमंत्राचा वापर करुन तिच्या परिवारासह तिच्या नातेवाईकांना देखील संपवून टाकेल, अशी धमकी त्या भोंदू बाबाने दिली. शेवटी त्या बाबांच्या धमक्यांना कंटाळून त्या आईने पोलीस स्टेशनसह राजकीय नेत्यांच्या उंबरठ्याच्या पायऱ्या झिझवल्या आणि त्या भोंदू बाबाला गजाआड केले.

त्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि सर्व वस्तूजन्य, वैद्यकीय आणि तांत्रिक पुराव्यावर आधारीत कुरार पोलिसांनी न्यायालयात खटला सुरू केला. पण खटला सुरू होताच तक्रारादार आईने आपली साक्ष फिरवली. माझी मुलगी घाबरली होती तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असं सांगून तिने केलेल्या तक्रारी विरोधातच  साक्ष दिली. हे सगळं ऐकून पोलिसांना आणि न्यायालयाला देखील आश्चर्याचा धक्का बसला. पण पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, आरोपी भोंदूबाबाने त्या आईच्या अल्पवयीन मुलीवर पूजा अर्चा करण्याच्या बहाणे लैंगिक अत्याचार केले, हे तपासात स्पष्ट झाल्याने तसंच न्यायालयात देखील हे पोलिसांनी पुराव्या सहित सिद्ध केल्याने आरोपी भोंदू बाळाला न्यायालयाने 12 वर्षांची शिक्षा सुनावली आणि खोटी साक्ष दिली म्हणून तिच्या विरोधात कुरार पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास सांगून आता न्यायालय त्या महिले विरोधात खटला सुरू करणार आहे.

मिथून चक्रवर्तींच्या घरी पोहोचले मोहन भागवत, भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण

खरंतर न्यायालयात कोणालाही साक्ष कक्षात उभं केल्यानंतर सर्वात आधी कक्षातील व्यक्तीला भगवत गीतेवर हात ठेवून ‘देवा शपथ खरे सांगेन, खोटे सांगणार नाही’ अशी शप्पथ दिली जाते. कुणी खोटी साक्ष देऊ नये यासाठी वर्षानुवर्षे न्यायालयात चालणारी ही प्रथा आहे.  मात्र, शपथ घेऊनही खोटी साक्ष देणे आणि ते देखील आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या बाजूने साक्ष देणे हा मोठा गुन्हा एका आईने केला. दिंडोशी सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार, नुकताच या महिलेविरोधात सहायक प्रबंधकांच्या तक्रारीवरून कुरार पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला आहे. खोटी साक्ष देणाऱ्या त्या आईविरोधात भादंवि कलम १८१ (शपथ घेऊन खोटी साक्ष देणे), १९३ (खोट्या पुराव्यांबाबत शिक्षा), १९९ (ग्राह्य धरलेल्या पुराव्यांमध्ये खोटे कथन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Crime news, Maharashtra, Mumbai, Mumbai police, Sexual assault