मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Pune News: किरकोळ कारणावरून वाद पेटला; महिलेच्या गुप्तांगावर लाथा मारत हत्येचा प्रयत्न

Pune News: किरकोळ कारणावरून वाद पेटला; महिलेच्या गुप्तांगावर लाथा मारत हत्येचा प्रयत्न

देशपांडे यांना झालेल्या मारहाणीत ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

देशपांडे यांना झालेल्या मारहाणीत ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Crime in Pune: मुलाच्या किरकोळ अपघाताचा (Accident) राग मनात धरून दोन जणांनी एका महिलेला बेदम मारहाण (Woman beaten by two men) केली आहे.

पुणे, 23 मे: मुलाच्या किरकोळ अपघाताचा (Accident) राग मनात धरून दोन जणांनी एका महिलेला बेदम मारहाण (Woman beaten by two men) केल्याची घटना समोर आली आहे. आरोपींनी फिर्यादी महिलेला मारहाण करत खाली पाडून तिच्या गुप्तांगावर लाथा मारल्या आहेत. एवढंच नव्हे तर आरोपींनी पीडितेच्या गळ्यावर पाय देऊन हत्येचा प्रयत्न (Tried to murder) देखील केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पिता पुत्राला अटक (Accused father and son arrest) केली असून घटनेचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

असिफ अब्दुल रेहमान शिकीलकर (वय-52) आणि अमिन असिफ शिकीलकर (वय-21) असं अटक केलेल्या आरोपी पिता -पुत्रांची नावं असून दोघंही कात्रज परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेनं भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोप दोघंही एकमेकांच्या शेजारी राहतात. संबंधित घटना गुरुवारी (20 मे) रात्री दहाच्या सुमारास दामगुडे इमारतीत घडली आहे.

फिर्यादी आणि आरोपीच्या मुलाचा किरकोळ अपघात झाला होता. अपघाताचा राग मनात धरून आरोपी शिवीगाळ करत धमकी देत होते. यावेळी फिर्यादी आणि त्यांचे पती आरोपींना समजावण्यासाठी गेले. पण त्यांच्यातला वाद मिटण्याऐवजी वाढत गेला. यावेळी आरोपींनी फिर्यादीला आणि त्यांच्या पतीला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचबरोबर आरोपींनी फिर्यादी महिलेला खाली पाडून तिच्या पोटावर आणि गुप्तांगावर लाथा मारून विनयभंग केला.

हे वाचा-हात-पाय बांधून दलित तरुणाला पोलिसाकडून मारहाण, पाणी मागितलं असता पाजलं मूत्र

आरोपी पिता पुत्र एवढ्यावरचं थांबले नाहीत. तर त्यांनी खाली पडलेल्या फिर्यादी महिलेच्या गळ्यावर पाय देऊन त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पीडित दाम्पत्यानं भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक धामणे करत आहेत.

First published:

Tags: Beating retreat, Crime news, Pune, Woman