Home /News /crime /

लग्नात जेवणावरून जोरदार राडा, वरपिता बेशुद्ध; लाखो रुपये लुबाडले

लग्नात जेवणावरून जोरदार राडा, वरपिता बेशुद्ध; लाखो रुपये लुबाडले

लग्नात जेवणाच्या मुद्द्यावरून झालेल्या हाणामारीत नवरीच्या (Fight in the marriage over food) वडिलांना बेशुद्ध होईपर्यंत मारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    जयपूर, 28 नोव्हेंबर: लग्नात जेवणाच्या मुद्द्यावरून झालेल्या हाणामारीत नवरीच्या (Fight in the marriage over food) वडिलांना बेशुद्ध होईपर्यंत मारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नकार्यात ठेवण्यात आलेल्या जेवणावरून पाहुणे (Dispute over food in the marriage) मंडळींनी जाब विचारला. त्यावरून सुरू झालेल्या वादानंतर मुलीच्या वडिलांच्या भाच्याने त्यांना जोरदार मारहाण केली. यात त्याचे काही सहकारीदेखील सहभागी झाले. त्यामुळे वडील बेशुद्ध पडले आणि त्यांना (Father of groom hospitalized) हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं अशी घडली घटना राजस्थानच्या कोटा परिसरात राहणारे झुल्फिकार नौताडा यांचा मुलगा इमरान याचं लग्न होतं. लग्नात दोन्ही बाजूचे नातेवाईक जमले होते. रात्री 11 वाजता पाठवणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यावेळी जेवणाऱ्या मुद्द्यावरून नातेवाईकांमध्ये वाद सुरू झाला आणि पाहता पाहता जुन्या वादांचे मुद्दे उकरून काढण्यात आले. त्यामुळे वाद विकोपाला गेला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. मुलाच्या वडिलांना मारहाण मुलाच्या वडिलांना त्यांच्याच भाच्याने जुन्या प्रकरणातील राग काढत मारहाण केली. यावेळी त्याच्यासोबत आकताफ, इम्तियाज अली, नजर अली, फरदीन, इजहार अली आणि अफरोज यांनीदेखील आपल्याला मारहाण केल्याचा आरोप झुल्फिकार यांनी केला आहे. भाच्याने आपला गळा दाबन आपला खून करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे वाचा- मुंबई-पुण्यात वादळी वाऱ्यासह बरसणार सरी; मराठवाड्यालाही अवकाळी पावसाचा धोका 1 लाख 90 हजार चोरल्याचा आरोप हाणामारी सुरू असताना भाच्याने आणि त्याच्या साथीदारांनी आपल्या खिशातून 1 लाख 90 हजार रुपये चोरून नेल्याचा आरोपही झुल्फिकार यांनी केला आहे. जुनी खुन्नस काढण्यासाठी जेवणाचा मुद्दा उकरून काढण्यात आला आणि मुद्दाम वाद वाढवत हाणामारी करण्यात आली, असा आरोप झुल्फिकार यांनी केला आहे. या हाणामारीत गाड्यांवरही हल्ले करण्यात आले असून लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या गाड्यांचं नुकसान झालं. या घटनेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल असून किरकोळ कारणावरून गुन्हेगारी कृत्य कशा प्रकारे घडू शकतं, याची प्रचितीच सर्वांना आली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime news, Father, Marriage, Police, Rajsthan

    पुढील बातम्या