Home /News /crime /

जिममध्ये डंबेल उचलण्यावरून झालेल्या मारामारीमुळे दगडफेक, गोळीबार अन् जाळपोळ; भयंकर घटना

जिममध्ये डंबेल उचलण्यावरून झालेल्या मारामारीमुळे दगडफेक, गोळीबार अन् जाळपोळ; भयंकर घटना

हा वाद इतका वाढला की मध्यरात्री अचानक एका बाजूच्या लोकांनी दुसऱ्या बाजूच्या लोकांच्या घरावर हल्ला केला. संपूर्ण कुटुंबाला मारहाण केली. तिथे गोळीबार आणि दगडफेक केल्यानंतर हल्लेखोरांनी घराला आग लावली. पोलिसांना माहिती मिळण्यापूर्वीच आरोपींनी तेथून पळ काढला.

पुढे वाचा ...
    बरेली, 15 मे : जिममध्ये डंबेल उचलण्यावरून दोन तरुणांमध्ये वाद (Fight in gym for dumble) झाला. हा वाद इतका वाढला की मध्यरात्री अचानक एका बाजूच्या लोकांनी दुसऱ्या बाजूच्या लोकांच्या घरावर हल्ला केला. संपूर्ण कुटुंबाला मारहाण केली. येथे गोळीबार (fired on friends family after fight) आणि दगडफेक (stone pelting) केल्यानंतर हल्लेखोरांनी घराला आग (set house on fire after fight in gym) लावली. पोलीस माहिती मिळण्यापूर्वीच आरोपींनी तेथून पळ काढला. घरात जाळपोळ आणि गोंधळासारखी घटना घडूनही सीओ पातळीपेक्षा वरचा अधिकारी घटनास्थळी पोहोचला नाही. असलम रझा यांचा मुलगा कैफ सकाळ-संध्याकाळ जिममध्ये व्यायाम करण्यासाठी जातो. सलीम यांचा मुलगा बाबू, इरफान हे तिथल्या जिममध्ये जातात. शनिवारी रात्री उशिरा कैफचं जिममध्ये डंबेल उचलण्यावरून बाबूसोबत भांडण झालं. त्यावेळी मित्रांनी प्रकरण शांत केले. मात्र, रात्री उशिरा सलीम आणि अनीस यांच्यासह डझनभर जणांनी अचानक अस्लम रझा यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. हे वाचा - मंडपातून थेट तुरुंगात पोहोचला नवरदेव; वराच्या धाकट्या भावासोबत लावलं नवरीचं लग्न त्यांनी संपूर्ण कुटुंबाला मारहाण करण्यास सुरुवात केली. अस्लम यांना धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. कैफ यालाही बेदम मारहाण केली. संपूर्ण घराची तोडफोड करण्यात आली. यानंतर घरात पेट्रोल टाकून आग लावली. कॉलनीत जाळपोळ आणि गोंधळ झाल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिस आणि अग्निशमन विभागाला माहिती दिली, त्यानंतर अग्निशमन विभागाच्या पथकाने आग आटोक्यात आणली आणि पोलिसांनी आता कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथील थाना फोर्ट परिसरातील बनखाना येथे हा प्रकार घडला. हे वाचा - 50 वर्ष सोबत जगले अन्..; पत्नीच्या निधनानंतर 10 मिनिटातच पतीचाही मृत्यू घटनेनंतर एसपी सिटी रवींद्र कुमार घटनास्थळी पोहोचले असता त्यांनी सांगितलं की, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं असून, उर्वरित गुंडांसाठी पोलीस छापे टाकत आहेत. दोषींवर कडक कारवाई केली जाईल.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Crime news, Up crime news

    पुढील बातम्या