मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /रेड्यांच्या टक्करीवरून माणसांमध्येच जुंपली; खेळ राहिला लांब अन् नांदेडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी

रेड्यांच्या टक्करीवरून माणसांमध्येच जुंपली; खेळ राहिला लांब अन् नांदेडमध्ये दोन गटात तुफान हाणामारी

रेड्यांच्या टक्करीवरून नांदेडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.

रेड्यांच्या टक्करीवरून नांदेडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.

रेड्यांच्या टक्करीवरून नांदेडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nanded, India

मुजीब शेख, प्रतिनिधी

नांदेड, 22 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यात आता नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रेड्यांच्या टक्करीवरून माणसांत दोन गटात जोरदार हाणामारी झाली. लाठ्या काठ्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

रेड्यांच्या टक्करीवरून माणसांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या घटनेत अनेकांना जबर दुखापत झाली. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील शेल्हाळी गावात हाणामारीची ही घटना घडली. दरम्यान, मारहाणीच्या या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला.

रेड्यांच्या टक्करीना बंदी असताना इथल्या महाकालीच्या यात्रेत टक्करी घेण्यात आल्या. त्यातून वाद झाल्याने दोन गट एकमेकांच्या अंगावर लाठ्या काठ्या घेऊन धावून गेले. या मारहाणीत काहीजण जखमी झाले आहेत. त्यामुळे पोलीस आता व्हीडिओच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - Success Story : पाणीपुरी विकून मुलाला बनवले पायलट, रविकांतचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायी!

रत्नागिरी : हळदी कुंकू कार्यक्रम आटपून परतत असताना ऍपे रिक्षा उलटली, भयानक अपघात

राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटना घडत आहेत. आजच समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच आता रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमधील देवघर गावानजीक भीषण अपघात झाला आहे.

हळदी कुंकू कार्यक्रम आटपून परतत असताना ऍपे रिक्षा पालटली. या अपघातात नऊ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातातील सर्व जखमी महिलांना कळंबणी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्यावर याठिकाणी उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमधील देवघर गावानजीक हा भीषण अपघात झाला आहे. 

First published:

Tags: Nanded