मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

कांदा मागण्यावरून हॉटेल स्टाफची तरुणांना जबर मारहाण, रक्तबंबाळ तरुणांची पोलिसांत तक्रार

कांदा मागण्यावरून हॉटेल स्टाफची तरुणांना जबर मारहाण, रक्तबंबाळ तरुणांची पोलिसांत तक्रार

केवळ कांदा देण्याच्या मुद्द्यावरून रेस्टॉरंटचा मॅनेजर आणि चार तरुण यांच्यात रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

केवळ कांदा देण्याच्या मुद्द्यावरून रेस्टॉरंटचा मॅनेजर आणि चार तरुण यांच्यात रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

केवळ कांदा देण्याच्या मुद्द्यावरून रेस्टॉरंटचा मॅनेजर आणि चार तरुण यांच्यात रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

कोलकाता, 29 डिसेंबर: रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) कांदा (Onion) मागण्याच्या मुद्द्यावरून मॅनेजर (Manager) आणि काही तरुणांमध्ये (Youth) वाद झाल्यावर तुंबळ हाणामारी (Big Fight) झाल्याची घटना समोर आली आहे. काही तरुण रात्री 11 वाजता रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सोबत दारू आणली होती, असा दावा रेस्टॉरंटच्या वतीनं करण्यात आला आहे, तर केवळ कांदा मागण्याच्या मुद्द्यावरून हा राडा झाल्याचा दावा तरुणांनी केला आहे. 

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकात्यात एका सुप्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये रात्री 11 वाजण्याच्या सुमाराला चार तरुण रेस्टॉरंटमध्ये आले आणि त्यांनी जेवण्याची ऑर्डर दिली. हॉटेलच्या फॅमिली रुममध्ये ते बसले. रेस्टॉरंटच्या दाव्यानुसार या तरुणांनी प्लास्टिकच्या बाटल्यांमधून दारू आणली होती आणि जेवण करता करता ते दारू पित होते. रेस्टॉरंटमध्ये दारु पिण्यास मनाई असल्याची कल्पना त्यांना देण्यात आली. मात्र तरीही त्यांनी दारु पिणं सुरूच ठेवल्यामुळे त्यांना रेस्टॉरंटमधून हाकलून देण्यात आलं, असा दावा रेस्टॉरंटच्या मॅनेजरनं केला आहे. 

कांद्यावरून झाला वाद

आपण केवळ कांदा मागितला होता. त्यावरून हा वाद सुरू झाला होता. आपण दारू पित नव्हतो, असा दावा तरुणांनी केला आहे. कांद्याच्या किरकोळ मुद्द्यावरून रेस्टॉरंटच्या स्टाफनं उलट उत्तर दिल्यामुळे वाद पेटला आणि त्यातून रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली, असा दावा तरुणांच्या वतीनं करण्यात आला आहे. 

हे वाचा -

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून तिथं उपस्थित असणाऱ्या इतरांची साक्ष घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या तरुणांपैकी एकाच्या बहिणीनं सोशल मीडियावर या विषयाचा वाचा फोडली आहे. जरी या तरुणांनी दारु आणली होती, हे मान्य केलं तरी रेस्टॉरंटच्या मॅनेजरनं पोलिसांना का बोलावलं नाही, असा सवाल तिने उपस्थित केला आहे. पोलिसांनी मॅनेजर आणि वेटरला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

First published:

Tags: Kolkata, Onion, Restaurant