Home /News /crime /

दुसऱ्या पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद, जन्मदात्यानंच केली मुलाची हत्या

दुसऱ्या पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद, जन्मदात्यानंच केली मुलाची हत्या

येथे संयोगितागंज पोलिसांनी मृत तरुणीचे शव पोस्टमार्टमसाठी दिले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.

येथे संयोगितागंज पोलिसांनी मृत तरुणीचे शव पोस्टमार्टमसाठी दिले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे.

दुसरी पत्नी घरी आणण्यावरून वडील आणि मुलामध्ये सतत वाद होत होते.

    गोंदिया, 01 ऑक्टोबर : कोरोनामुळे आधीच कुटुंबात काही कलह सुरू असतानाच मोठा अनर्थ घडला. मुलानं दुसरी बायको घरी आणण्याचा हट्ट केला आणि घात झाला. मुलगा हट्टाला पेटल्याच्या रागातून जन्मदात्या वडिलांनी 36 वर्षांच्या पोटच्या मुलाची निर्घृण हत्या केल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली. या हत्येनं गोंदिया जिल्हा हादरला आहे. ही घटना देवरी तालुक्यातील शिलापूर गावात घडली. 36 वर्षीय तरुणानं परस्पर दुसरं लग्न केलं आणि आपल्या दुसऱ्या पत्नीला घरी आणण्यासाठी त्याचे कुटुंबातील व्यक्तीसोबत खटके उडायला लागले. बुधवारी वडिलांसोबत या कारणावरून वादही झाला. दुसरी पत्नी घरी आणण्यासाठी मुलगा हट्टाला पेटला आणि त्याच रागातून वडिलांनी मुलाची हत्या केली. जन्मदात्या वडिलांनीच कुऱ्हाडीच्या दांड्याने वार करून निर्घृण हत्या केली. हे वाचा-Hathras Gang rape : पोलिसांचा लाठीमार, राहुल गांधींना धक्काबुक्की; पाहा VIDEO दुसरी पत्नी घरी आणण्यावरून वडील आणि मुलामध्ये सतत वाद होत होते. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच तातडीनं घटनास्थळी दाखल होतं त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपी वडिलांना अटक केली. देवरी तालुक्यात एकाच आठवड्यात हत्येची थरारक दुसरी घटना आहे. याआधी मोठ्या भावानं लहान भावाची हत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली होती. त्यातून नागरिक सावरत असतानाच आता ही थरारक घटना समोर आली आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Bhandara Gondiya

    पुढील बातम्या