• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत आधी मैत्री, मग भेटण्यासाठी बोलवलं; महिला पोलिसानी अशी केली अटक

बलात्कार प्रकरणातील आरोपीसोबत आधी मैत्री, मग भेटण्यासाठी बोलवलं; महिला पोलिसानी अशी केली अटक

पीडितेच्या तक्रारीनंतर पोलीस उपनिरीक्षक प्रियंका सैनी यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. यानंतर फेसबुकवर त्या व्यक्तीला शोधण्यास सुरुवात केली. यासाठी एसआयनं एक नवीन अकाऊंट (Facebook Account) तयार केलं

 • Share this:
  नवी दिल्ली 02 ऑगस्ट : बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक करण्यासाठी पहिला पोलीस उपनिरीक्षकानं अनोखी पद्धत अवलंबली. तिनं आरोपीसोबत मैत्री करत त्याला तुरुंगात पोहोचवलं. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 24 वर्षीय आरोपीला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसातील (Delhi Police) महिला पोलीस उपनिरीक्षकानं आधी या व्यक्तीसोबत सोशल मीडियावर (Social Media) मैत्री केली, नंतर त्याला मैत्रीच्या बहाण्यानं भेटण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये बोलवत अटक केली. शिक्षिका शिकवत असतानाच ऑनलाइन क्लासमध्ये लागला पॉर्न व्हिडीओ; पुण्यातील घटना पीडितेनं पोलिसांना सांगितलं, की काही महिन्यांपूर्वी ती आपल्या घराजवळ एका व्यक्तीला भेटली होती आणि यानंतर त्यांची मैत्री झाली. यानंतर दोघांनी एकमेकांसोबत शारीरिक संबंधही ठेवले, मात्र यानंतर आरोपी तिच्यापासून दूर जाऊ लागला. त्यानं मुलीला कधी आपला फोन नंबरही दिला नाही. अशात आरोपीचा (Rape Accused) शोध घेणं पोलिसांसाठी सोपं नव्हतं. महिलेसमोरच कपडे काढून प्रायव्हेट पार्ट दाखवू लागला पोलीस; सांगितलं विचित्र कारण पीडितेच्या तक्रारीनंतर पोलीस उपनिरीक्षक प्रियंका सैनी यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. यानंतर फेसबुकवर त्या व्यक्तीला शोधण्यास सुरुवात केली. यासाठी एसआयनं एक नवीन अकाऊंट (Facebook Account) तयार केलं आणि यावरुन आरोपीला फ्रेंड रिक्वेस्ट (Friend Request) पाठवून चॅट करण्यास सुरुवात केली. मैत्री होताच एसआयनं आरोपीला भेटण्यासाठी बोलावलं. 31 जुलै रोजी आरोपी वारंवार भेटण्याची जागा बदलत राहिला, मात्र अखेर त्याला श्री माता मंदिर महावीर एन्क्लेव येथे अटक करण्यात आली. चौकशीत त्यानं खुलासा केला, की तो द्वारकामध्ये एका बांगड्यांच्या दुकानात काम करतो. मागील दीड वर्षापासून त्यानं अनेक मुलींसोबत असं केलं आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: