मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

स्वत:च्या लग्नाच्या खरेदीसाठी घराबाहेर पडला आणि पोलिसांनी हेरलं; दंगल भडकावण्याच्या प्रकरणात तरुण तुरुंगात

स्वत:च्या लग्नाच्या खरेदीसाठी घराबाहेर पडला आणि पोलिसांनी हेरलं; दंगल भडकावण्याच्या प्रकरणात तरुण तुरुंगात

सोशल मीडियाच्या माध्यमातून तो पाकिस्तानच्या संपर्कात होता.

सोशल मीडियाच्या माध्यमातून तो पाकिस्तानच्या संपर्कात होता.

सोशल मीडियाच्या माध्यमातून तो पाकिस्तानच्या संपर्कात होता.

  • Published by:  Meenal Gangurde

इंदूर, 3 सप्टेंबर :  दंगल भडकावण्याच्या (inciting riots) कारस्थानात अटक केलेला आरोपी अल्तमस याला तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत (Police Custody) पाठविण्यात आलं आहे. पोलीस चौकशीत अल्तमसने अनेक मोठे खुलासे केले आहेत. त्याच्या मोबाइलमध्ये डेटामधूनही अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी पोलिसांनी अल्तमसला अटक केलं. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याचं लग्न ठरलं होतं.

लग्नाची तयारी शेवटच्या टप्प्यात होती. त्याच्या होणाऱ्या बायकोला मेंदीदेखील लावली होती. तो स्वत: बाजारात लग्नाचं सामान घेण्यासाठी पोहोचला तेव्हा पोलिसांना त्याचं लोकेशन मिळालं. पोलिसांनी लग्नाच्या सामानासह त्याला कस्टडीत घेतलं. अल्तमशचा मोबाइल डेटा रिकव्हर करण्यात आला आहे. यामध्ये अनेक धक्कादायक तथ्य समोर आले आहेत. यामध्ये अनेक परदेशी क्रमांक आणि धार्मिक भावना भडकावणारे मेसेजदेखील सापडले आहेत. IB आणि ATS कडून देखील साक्ष जमविण्याचा प्रयत्न करीत आहे. सायबरच्या मदतीने सर्व क्रमांकाची माहिती काढली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्तमश खान लव जिहादच्या विरोधात लढणाऱ्या संघटनांच्या विरोधात मुस्लीम तरुणांचा शोध करीत होते. यासाठी त्याला प्रशिक्षणदेखील मिळालं होतं. तर दुसरीकडे आयबी अधिकाऱ्यांनी यासंबंधात खोल चौकशी केली आहे. आरोपीचा भीम आर्मीच्या सदस्यांशी संपर्क केला आहे. जी हिंदू संघटनांच्या विरोधात तो तयारी करीत होता.

हे ही वाचा-विद्यार्थ्यांनी जन्माष्टमीचा उपवास ठेवला म्हणून शिक्षकाची सटकली; अशी केली शिक्षा

इतकच नाही तर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून तो पाकिस्तानच्या संपर्कात होता. पाकिस्तानच्या सोबत काही अशी गोष्टी समोर आल्या आहेत, त्यावरुन अल्तमससं तालिबान्यांशीही बोलणं झालं आहे. गृहमंत्र्यांनी सांगितलं की, आरोपींजवळ 200 आपत्तीजनक साहित्य, दस्तावेज, पेनड्राइव्ह आदी सापडले आहेत.

First published:

Tags: Crime news, Indore News