मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बापाचं दुष्कृत्य मोबाइलमध्ये केलं कैद; मुलीनेच पोलिसात जाऊन वडिलांचं फोडलं बिंग

बापाचं दुष्कृत्य मोबाइलमध्ये केलं कैद; मुलीनेच पोलिसात जाऊन वडिलांचं फोडलं बिंग

या घटनेत मुलीच्या आईचाही हात असल्याचं समोर आलं आहे.

या घटनेत मुलीच्या आईचाही हात असल्याचं समोर आलं आहे.

या घटनेत मुलीच्या आईचाही हात असल्याचं समोर आलं आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

पाटना, 5 मे : बिहारच्या (Bihar News) समस्तीपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एक बाप आपल्याच 18 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करत होता. यात पीडितेच्या आईनेही तिच्या पतीला म्हणजेच मुलीच्या वडिलांना पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. दोघेही पीडितेला धमकावून गप्प करायचे. यानंतर पीडितेने वडिलांच्या घाणेरड्या कृत्याचा व्हिडिओ बनवला आणि पोलीस ठाणे गाठून वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली.

पीडितेच्या तक्रारीवर पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे. आणि या प्रकरणात तपास करीत आहे. आरोपीचं वय 50 वर्षे आहे. आणि व्यवसायाने शिक्षक आहे. पीडितेचा आरोप आहे की, वडील प्रत्येक दिवशी तिच्यासोबत दुष्कृत्य करीत होता. जेव्हा ती आईला याबाबत सांगत होती, तो तिलाच दोषी ठरवत होता.

हे ही वाचा-पहिलं लग्न 2003, मग 2013, 2016 शेवटी 2021; लुटारू नवरीचा प्रताप पाहून हादराल!

पीडितेचं म्हणणं आहे की, जेव्हा ती वडिलांच्या कृत्याला वैतागली, त्यानंतर तिने थेट पोलीस ठाणे गाठलं. त्यावेळी पोलिसांनी तिला पळवून लावलं. आणि तक्रार दाखल करून घेतली नाही. मात्र पीडितेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष वळवलं. आणि आरोपी विरोधात कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी सांगितलं की, पीडितेच्या तक्रारीवर आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा तपास केला जात आहे. या घटनेत आणखी काही लोकांचा समावेश असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

First published:

Tags: Bihar, Crime news, Father, Rape