मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सकाळी नदीवर अंघोळीला गेल्यावर दिसले मानवी शरीराचे तुकडे; मुलीला छेडल्यामुळे बापाने दिली शिक्षा

सकाळी नदीवर अंघोळीला गेल्यावर दिसले मानवी शरीराचे तुकडे; मुलीला छेडल्यामुळे बापाने दिली शिक्षा

सकाळी नदीवर अंघोळीला गेल्यावर दिसले मानवी शरीराचे तुकडे दिसल्यानंतर गावकरी भयभीत झाले.

सकाळी नदीवर अंघोळीला गेल्यावर दिसले मानवी शरीराचे तुकडे दिसल्यानंतर गावकरी भयभीत झाले.

सकाळी नदीवर अंघोळीला गेल्यावर दिसले मानवी शरीराचे तुकडे दिसल्यानंतर गावकरी भयभीत झाले.

  • Published by:  Meenal Gangurde

भोपाळ, 28 मार्च : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) नर्मदा नगरमध्ये अल्पवयीन मुलीला छेडल्यानंतर बापाने संताप व्यक्त केला आणि त्याने आपल्या साथीदारांसह आरोपीचा भयंकर शेवट केला. हे वृत्त वाचून तुमच्याही अंगावर काटा उभा राहील.

मिळालेल्या माहितीनुसार, सक्तापुरावा गावात नरेंद्र रविवारी सकाळी नदीत अंघोळीसाठी गेला होता. यावेळी नदीच्या घाटावरील शिव मंदिराजवळ रक्त सांडलेलं दिसलं. यानंतर नदीच्या पाण्यात शरीराचे अवयव वेगवेगळे पाहून तो घाबरला. तो धावत गावी आला आणि सरपंच शिवराज सिंह यांना सूचना दिली. सरपंचांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. यानंतर पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचले. यावेळी काही स्थानिकांच्या मदतीने नदीतून डोकं, धड आणि पाय बाहेर काढण्यात आले. फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मृतदेह कुऱ्हाडीने कापण्यात आला आहे.

सोशल मीडियावर फोटो टाकला तेव्हा ओळख पटली.. मृतक व्यक्तीच्या शिराचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्याची ओळख पटली. तो बोडानी गावातील निवासी त्रिलोकचंद (55) असल्याचं समोर आलं. त्याचे आई-वडील सक्तापुरमध्ये राहतात. तर त्रिलोकचंद आणि त्याच्या चुलत भावाचं घर सक्तापूरपासून 16 किमी लांब बोडानी गावात आहे. यानंतर रामचंद्रने सांगितलं की, शनिवारी रात्री 9 वाजता त्याने त्रिलोकला जेवण दिलं होतं. यानंतर तो घरातून निघून गेला.

हे ही वाचा-पुणे: पोलीस ऑफिसरची पत्नी अन् सासूचा राडा, महिलेला दगडाने जीवे मारण्याचा प्रयत्न

12 वर्षांपासून पत्नीने सोडली साथ... त्रिलोकचंदच्या वागणुकीला संतापून त्याची पत्नी 12 वर्षांपूर्वीच सोडून निघून गेली होती. यानंतर त्याने त्याच्या नातेवाईकांना घर उभारण्यासाठी सक्तापूरमध्ये जमिन दिली होती. दरम्यान ज्याला जमिन दिली त्या छन्नूच्या 14 वर्षांच्या मुलीची वारंवार छेड काढत होता. यापूर्वी दोनदा अशी घटना घडल्यानंतर छन्नूने त्याला समजावलं होतं. मात्र त्याने ऐकलं नाही. यावरुन दोघांमध्ये वादही झाला होता. शनिवारी रात्री पुन्हा तो गावी आला आणि छन्नूच्या मुलीसोबत गैरवर्तणूक केली. यानंतर छन्नू संतापला आणि त्रिलोकला धडा शिकवण्याचं ठरवलं. यासाठी त्याने आपल्या मेव्हण्याची मदत घेतली. यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छन्नू आणि उमेश त्रिलोकचंद यांना बाईकवर बसवून नदीजवळ घेऊन गेले होते. येथे मासे कापण्याच्या शस्त्राने त्याचं डोकं आणि पाय कापले. याशिवाय मृतदेह नदीत फेकून दिला. छन्नू आणि उमेशसह चार लोकांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चौघांची चौकशी सुरू आहे.

First published:

Tags: Crime news, Madhya pradesh, Murder

पुढील बातम्या