कॅथल,25 जानेवारी: हरियाणातील (Haryana) कॅथलमध्ये (Kaithal) वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदाता बापच पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत होता. पोलिसांनी नराधम बापाच्या हाता बेड्या ठोकल्या आहेत. नराधम बाप मागील पाच वर्षांपासून आपल्या 13 वर्षीय मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार करत होता. मात्र, बापाकडून वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून पीडित मुलीने हिंमत दाखवून तिच्या सावत्र आईला आपबिती सांगितली. नंतर आईने 'चाइल्ड हेल्पलाइन 1098' वर कॉल करून पतीविरुद्ध तक्रार नोंदवली.
'पॉक्सो' कायद्यानुसार कारवाई..
तक्रार मिळताच चाइल्ड हेल्पलाइन करनाल आणि अंबाला कार्यालयातून कॅथल येथील बालकल्याण समितीकडे हे प्रकरण पोहोचले. बालकल्याण समितीने पीडित मुलीचे कॉऊंसलिंग केले. महिला पोलिस ठाण्याच्या एसएचओ डॉ. नन्ही देवी यांच्या मदतीने मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर मुलीवर बलात्कार झाल्याचा खुलासा डॉक्टरांनी केला. नंतर पोलिसांनी नराधम बापाच्या हातात बेड्या ठोकल्या. आरोपीवर पॉक्सो कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
नशेत तर्रर्र दोन तरुणांचा 70 वर्षांच्या आजीवर सामूहिक बलात्कार
राजस्थानातील श्रीगंगानगरमधील (Sriganganagar)सादुलशहर पोलिस हद्दीत येणाऱ्या पतली गावात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका 70 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेवर दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. दोन्ही नराधम दारुच्या नशेत तर्रर्र होते. नराधमानी आधी पीडित महिलेल बेदम मारहाण केली होती. पीडित महिलेवर सादुलशहर येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घरी एकटीच होती वयोवृद्ध महिला
मिळालेली माहिती अशी की, घटना घडली तेव्हा पीडित महिला घरी एकटीच होती. तिचा मुलगा उपसरपंच पदाच्या निवडणुकीच्या कामाने बाहेर गेला होता. पीडिता एकटी असल्याचे पाहून दोन्ही नराधम घरात घुसले. त्यांनी महिलेला बेदम मारहाण केली. नंतर तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. रात्री उशीर पीडितेला मुलगा घरी आल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. पीडितेला तातडीने स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी सादुलशहर येथील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नराधमांनी कबूल केला गुन्हा...
70 वर्षीय वयोवृद्ध महिलेवर झालेल्या सामूहिक अत्याचाराची सादुलशहर पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पीडितेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही नराधमांना अटक केली आहे. दलेर सिंह आणि मीमा सिंह अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींनी पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Haryana