मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /बापानंच अडीच वर्षाच्या मुलाला 40 हजारात विकलं; धक्कादायक कारण आलं समोर

बापानंच अडीच वर्षाच्या मुलाला 40 हजारात विकलं; धक्कादायक कारण आलं समोर

एका व्यक्तीनं आपल्या अडीच वर्षाच्या मुलाला 40 हजारासाठी विकलं आहे. या बापानं ड्रग्ज (Drugs) घेण्यासाठी आपल्या मुलाला विकल्याचं (Father Sold his Son to Buy Drugs) समोर आलं आहे.

एका व्यक्तीनं आपल्या अडीच वर्षाच्या मुलाला 40 हजारासाठी विकलं आहे. या बापानं ड्रग्ज (Drugs) घेण्यासाठी आपल्या मुलाला विकल्याचं (Father Sold his Son to Buy Drugs) समोर आलं आहे.

एका व्यक्तीनं आपल्या अडीच वर्षाच्या मुलाला 40 हजारासाठी विकलं आहे. या बापानं ड्रग्ज (Drugs) घेण्यासाठी आपल्या मुलाला विकल्याचं (Father Sold his Son to Buy Drugs) समोर आलं आहे.

गुवाहाटी 08 ऑगस्ट : नुकतंच एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. या घटनेत एका व्यक्तीनं आपल्या अडीच वर्षाच्या मुलाला 40 हजारासाठी विकलं आहे. या बापानं ड्रग्ज (Drugs) घेण्यासाठी आपल्या मुलाला विकल्याचं (Father Sold his Son to Buy Drugs) समोर आलं आहे. ही धक्कादायक घटना आसाममधील (Assam) आहे. आरोपीच्या पत्नीनं केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलाच्या बापाला आणि त्याला विकत घेणाऱ्या महिलेला अटक केली आहे.

ही घटना आसामच्या गुवाहाटीपासून 80 किलोमीटर दूर असलेल्या मोरीगावच्या लहारीघाट येथे घडली आहे. इथे राहणाऱ्या अमीनुल इस्लाम नावाच्या व्यक्तीनं आपल्याच अडीच वर्षाच्या मुलाला साजिदा बेगम नावाच्या महिलेला विकलं. मुलाची आई रुकमिणा बेगमनं या घटनेची तक्रार पोलिसांत दिली. यानंतर पोलिसांनी अमीनुल आणि साजिदा या दोघांनाही अटक केली.

वडिलांच्या उपचारासाठी मुलाचं गुन्हेगारी पाऊल; मंदिरात दानपेटीवर डल्ला मारला पण..

मिळालेल्या माहितीनुसार, रुकमिणा आणि अमीनुल यांचं काही महिन्यांपूर्वी भांडण झालं होतं. हे भांडणंही अमीनुलच्या ड्रग तस्करीच्या सवयीमुळेच झालं होतं. यानंतर ती पतीला सोडून आपल्या वडिलांच्या घरी गेली होती. अनेक महिन्यांपासून ती याच ठिकाणी राहत होती. एक दिवस अमीनुल रुकमिणाच्या वडिलांच्या घरी पोहोचला. तो असं सांगून मुलाला सोबत घेऊन गेला, की त्याचं आधारकार्ड बनवायचं आहे. मात्र, तीन-चार दिवस तो घऱी परतलाच नाही. यानंतर रुकमिणानं चौकशी केली असता असं समोर आलं, की पैशांसाठी त्यानं आपल्या मुलाला विकलं आहे. 5 ऑगस्टला रुकमिणानं याची तक्रार पोलिसांत केली.

...अन् तिला वाचवण्यासाठी सख्ख्या भावांनी लावली जीवाची बाजी; तिघांचा बुडून मृत्यू

पोलीस तपासात असं समोर आलं, की अमीनुलनं आपलं ड्रगचं व्यसन पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या मुलाला 40 हजार रुपयात विकलं. पोलिसांनी मुलाला त्याच्या आईकडे सुखरुप सोपवलं आहे, तसंच आरोपींना अटक केली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Drugs