लॉस एंजेलिस, 13 मार्च: खरंतर कोणताही आरोग्य विमा संबंधित व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी भरला जातो. पण एका पित्याने विम्याचे पैसे मिळवण्याच्या लालसेतून आपल्या पोटच्या दोन निष्पाप मुलांची हत्या (Father killed two Children) केली आहे. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर संबंधित आरोपीला न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. 13 आणि 8 वर्षीय मुलांची निर्घृण हत्या केल्याच्या आरोपात न्यायालयाने आरोपी पित्याला तब्बल 212 वर्षांची शिक्षा सुनावली (Court sentenced father for 212 year in jail) आहे. आतापर्यंत जगातील कोणत्याही आरोपीला इतक्या वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली नाही. त्यामुळे ही शिक्षा चर्चेचा विषय ठरली आहे.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील संबंधित आरोपी पित्याने 3 मिलियन अमेरिकन डॉलरच्या विम्याची रक्कम मिळवण्यासाठी (Murder for claim accidental Insurance) आपल्या पोटच्या दोन निष्पाप मुलांची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं ही हत्या एक अपघात असल्याचं भासवलं होतं, पण त्याचा त्याचा हा बनाव पकडला गेला आहे. अली एल्मेजायन असं या आरोपी पित्याचं नाव असून तो इजिप्त देशाचा नागरिक आहे. त्याचा हा बनाव उघड पडल्याने न्यायालयाने त्याला 212 वर्षांची कठोर शिक्षा सुनावली आहे. तसेच विम्याची रक्कम परत करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
हे ही वाचा -बारामतीत शेतकऱ्याच्या मुलाचं अपहरण, वडिलांना थेट 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी
अशी केली हत्या
आरोपीनं 2015 साली जाणूनबुजून आपली कार लॉस एंजेलिस पोर्ट याठिकाणी आपली कार पाण्यात बुडवली होती. यावेळी त्याने आपली पूर्व पत्नी आणि दोन मुलांना मरण्यासाठी गाडीतचं सोडलं होतं आणि स्वतः पोहून बाहेर आला. यानंतर तेथिल स्थानिक मासेमारी करणाऱ्या लोकांनी आरोपीच्या पत्नीला वाचवलं. मात्र गाडीच्या सीटांमध्ये अडकलेल्या मुलांना वाचवता नाही आलं. यानंतर आरोपी पित्यानं या घटनेला अपघात झाल्याचं भासवलं आणि विमा कंपनीकडून 260,000 अमेरिकन डॉलर हडपले. भारतीय रुपयांत ही रक्कम तब्बल 1 कोटी 88 लाख रुपये एवढी आहे. यानंतर आरोपीने या पैशातुन इजिप्तमध्ये एक बोट आणि काही जमीन खरेदी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Insurance, Murder, United States of America