• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • झोपलेल्या मुलीचा कटरने गळा कापताना गेले लाईट, थोडक्यात बचावल्या मायलेकी

झोपलेल्या मुलीचा कटरने गळा कापताना गेले लाईट, थोडक्यात बचावल्या मायलेकी

सिव्हिल इंजिनिअर (Civil engineer) असलेला बाप (Father) आपल्या मुलीचा (daughter) इलेक्ट्रिक कटरने (electric cutter) गळा कापण्याच्या (slit the throat) प्रयत्नात असतानाच लाईट (electricity) गेल्यामुळे मुलीचा जीव वाचल्याच घटना समोर आली आहे.

 • Share this:
  भोपाळ, 29 ऑगस्ट : सिव्हिल इंजिनिअर (Civil engineer) असलेला बाप (Father) आपल्या मुलीचा (daughter) इलेक्ट्रिक कटरने (electric cutter) गळा कापण्याच्या (slit the throat) प्रयत्नात असतानाच लाईट (electricity) गेल्यामुळे मुलीचा जीव वाचल्याच घटना समोर आली आहे. या घटनेत मुलीच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तर या इंजिनिअरच्या मुलाचा मात्र गळा कापला गेल्याने मृत्यू झाला आहे. आर्थिक संकटामुळे कुटूंब संपवण्याचा प्रयत्न भोपाळमध्ये राहणारे सिव्हिल इंजिनिअर रवी ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करत होते. निराशेच्या गर्तेत त्यांनी स्वतःसह कुटुंबाला संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने विष खाल्लं. तर मुलगा चिराग आणि मुलगी गुंजन यांना झोपेच्या गोळ्या दिल्या. चिराग झोपेत असतानाच निर्दयीपणे रवी ठाकरेने त्याचा गळा चिरला. गाढ झोपेत असल्यामुळे त्याला काही कळायच्या आतच तो गतप्राण झाला. तर मुलीचा गळा चिरत असताननाच लाईट गेल्यामुळे तिचा जीव वाचला. लाईट गेल्यानंतर आपला पती बेशुद्ध झाल्याचं पत्नी रंजना ठाकरे यांनी पोलिसांना सांगितलं. त्यानंतर काही वेळातच आपणही बेशुद्ध झालो. मात्र त्यापूर्वी आपल्याला उलटी झाल्यामुळे विषाचा परिणाम कमी झाल्याचं त्या म्हणाल्या. सकाळी सात वाजता त्यांना जाग आल्यानंतर त्यांनी शेजाऱ्यांकडे मदत मागितली. तेव्हा शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांना फोन करून याची कल्पना दिली. या घटनेत रवी ठाकरे आणि मुलगा चिराग यांचा मृत्यू झाला आहे. तर रंजना ठाकरे आणि मुलगी गुंजन या थोडक्यात बचावल्या आहेत, अशी बातमी ‘दैनिक भास्कर’ने दिली आहे. हे वाचा - भर रस्त्यात हंगामा! किन्नरांनी केली ज्येष्ठ नागरिकाची धुलाई कुटुंबीयांना धक्का भोपाळमध्ये राहणारा ठाकरे परिवार हा मूळचा बैतूलमधील असून कामानिमित्त ते भोपाळला राहत होते. गेल्या वर्षी भावाच्या मुलीच्या लग्नाला गेलेल्या रवी ठाकरेंनी आपल्या आर्थिक अडचणीची कल्पना भावाला आणि इतर नातेवाईकांनाही दिली होती. त्यावेळी धीर न सोडण्याचा सल्ला त्यांना नातेवाईकांनी दिला होता. मात्र आता रवी ठाकरेने उचललेलं हे पाऊल पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या सगळ्यात निष्पाप चिरागचा हकनाक बळी गेल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
  Published by:desk news
  First published: