Home /News /crime /

भयंकर! 15 वर्षांच्या गर्भवती मुलीचं धडापासून वेगळं केलं शीर, वडील-भावाने रचला डाव

भयंकर! 15 वर्षांच्या गर्भवती मुलीचं धडापासून वेगळं केलं शीर, वडील-भावाने रचला डाव

11 दिवसांनंतर खड्ड्यात मृतदेह मिळाल्याची सगळीकडे चर्चा सुरू झाली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल

    शाहजहांपूर, 07 ऑक्टोबर : जन्मदात्या वडील आणि भावानेच मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गर्भवती मुलीची वडिलांनी भावाच्या मदतीने कुऱ्हाड घालून शीर धडापासून वेगळं करत हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपी वडील आणि भावाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील शाहजहापूर भागात सिंधौली ब्लॉकमधील दुल्हापूर गावात हा धक्कादायक प्रकार घडला. लग्नाआधीच 15 वर्षांची युवती गर्भवती झाल्यामुळे संतप्त वडिलांनी कुऱ्हाडीनं आपला मुलीवर हत्या केली. धारदार शस्रानं डोक्यावर वार करून धडापासून शीर वेगळं केलं आणि त्यानंतर एका पोत्यात मृतदेह बांधून नाल्याजवळच्या खड्ड्यात पुरला होता. हे वाचा-दोस्त दोस्त ना रहा! मुंबईतील मर्डर मिस्ट्रीचा 105 दिवसांनंतर धक्कादायक खुलासा 11 दिवसांनंतर झाला धक्कादायक खुलासा 11 दिवसांनंतर खड्ड्यात मृतदेह मिळाल्याची सगळीकडे चर्चा सुरू झाली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तपासाला सुरुवात केली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वडील आणि भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. हे वाचा-चेष्टा-मस्करीला काही मर्यादा असते! गुदद्वारात हवा भरल्यामुळे तरुणाचा मृत्यू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत युवतीचे वडील शेती करतात. त्यांची 15 वर्षांची मुलगी गर्भवती होती. लग्नाआधीच गर्भवती असल्याच्या रागातून त्यांनी आपल्या मुलीची हत्या केली. 24 सप्टेंबरला त्यांनी हत्या केल्यानंतर मृतददेह पोत्यात बांधून जमिनीत पुरला मात्र तिथे दुर्गंधी पसरायला लागल्यानंतर प्राण्यांती खड्डा उकरून काढल्यावर हा धक्कदायक प्रकार समोर आला आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Uttar pradesh

    पुढील बातम्या