मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

जोशींनी मुलाची हत्या करुन ग्राइंडरने मृतदेहाचे तुकडे केले; कचऱ्याच्या पिशवीत कापलेले पाय अन्

जोशींनी मुलाची हत्या करुन ग्राइंडरने मृतदेहाचे तुकडे केले; कचऱ्याच्या पिशवीत कापलेले पाय अन्

बापानेच का केली असेल मुलाची हत्या?

बापानेच का केली असेल मुलाची हत्या?

बापानेच का केली असेल मुलाची हत्या?

  • Published by:  Meenal Gangurde

अहमदाबाद, 24 जुलै : गुजरातमधील अहमदाबाद येथील वासणा भागात 21 जून रोजी डोकं, हात, पाय नसलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. घटनेच्या 5 दिवसांनंतर वासणापासून साधारण 3 किमी अंतरावर एलिजब्रिज भागात मृतदेहाचे पाय सापडले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने सर्व केस सोडवली. हा मृतदेह स्वयम जोशी नावाच्या तरुणाचा आहे. ही हत्या त्याचे वयस्क वडील निलेश जोशी यांनी केली आहे.

पोलिसांनी निलेश जोशी यांना शनिवारी सायंकाळी राजस्थानमधून अटक केलं. वडिलांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. वडिलांनी सांगितलं की, मुलाला दारूचं व्यसन होतं. तो दररोज दारू पिऊन माझ्याशी भांडण करीत होता. यामुळे संतापलेल्या वडिलांनी मुलगा झोपेत असताना धारदार शस्त्राने त्याची हत्या केली. यानंतर ग्राइंडरने डोकं, हात, आणि पाय मृतदेहापासून वेगळे केले होते.

सीसीटीव्ही फुटेजमुळे खुलासा...

21 जून रोजी कलगी चार रोडवरुन जाताना कचरा उचलणाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. एका पॉलिथीनमध्ये कोणा व्यक्तीचे कापलेले शरीराचे अवयव होते. पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले तर एक वयस्क व्यक्ती स्कूटरवर त्याच पॉलिथिनसोबत दिसली होती. पोलिसांनी स्कूटरचा नंबरही शोधून काढला. पोलीस जेव्हा स्कूटरच्या मालकापर्यंत पोहोचले तर ती स्कूटर अंबावाडी भागात राहणाऱ्या निलेशला विकल्याचं समोर आलं.

पोलीस पोहोचेपर्यंत निलेश घरातून फरार झाले होते. मात्र पोलिसांनी त्यांचा मोबाइल लोकेशन ट्रॅक केला. लोकेशन राजस्थानमधील होती. पोलिसांनी राजस्थान पोलिसांशी संपर्क केला आणि शनिवारी सायंकाळी निलेश यांना अटक केली. चौकशीत निलेशने आपणच हत्या केल्याचं कबुल केलं. आरोपी निलेश एसटीचे निवृत्त कर्मचारी आहेत. निलेशच्या पत्नीचं निधन झालं आहे. वडील आणि मुलगा एकाच घरात राहत होते. तर बहीण शेजारच्या फ्लॅटमध्ये राहते. बहिणीचं लग्न झालेलं नाही. मुलाच्या हत्येमागे वडिलांशिवाय आणखी कोणाचा हात आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. सध्या बहिणीचीही चौकशी केली जात आहे.

First published:

Tags: Crime news, Gujrat, Murder