भोपाळ 18 जानेवारी : आई आणि वडील ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अशी दोन माणसं असतात जी निस्वार्थीपणे आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करतात. आपल्या मुलांसाठी अगदी स्वतःचा जीव धोक्यात टाकायलाही ते मागे-पुढे पाहात नाही. मुलांना प्रत्येक संकटापासून वाचवण्यासाठी ते नेहमीच पुढे येतात. मात्र, काही अशाही घटना समोर येतात, ज्यांच्यावर विश्वास ठेवणंही कठीण होतं. सध्या असंच एक प्रकरण मध्य प्रदेशच्या बुरहानपूर येथून समोर आलं आहे. या घटनेत एका पित्यानेच आपल्या मुलाची हत्या केली आहे (Father Killed his Son).
हत्येनंतर या व्यक्तीने आपली पत्नी आणि मुलगी यांच्या मदतीने मुलाच्या मृतदेहाची विल्हेवाटही लावली. पोलिसांनी 15 दिवसांनंतर या प्रकरणाचा खुलासा केला आहे. एका दोरीमुळे या प्रकरणाचा उलगडा करण्यात यश आलं आहे. बुरहानपूर पोलिसांनी सांगितलं, की ही घटना निबोला ठाणा क्षेत्रातील धुलकोट गावातील आहे. 5 जानेवारी रोजी रुपरेल नदीमध्ये रामकृष्ण नावाच्या एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.
मकरसंक्रातीला घरातून निघाले जिगरी दोस्त, नंतर असं घडलं की.. वाशिम जिल्हाच हादरला
या मृतदेहाचे हातपाय दोरीने बांधण्यात आले होते. तपासात असं समोर आलं की मृत तरुणाचे अनेकदा आपल्या कुटुंबीयांसोबत वाद होत असे. तपास पुढे सुरू असताना मृताच्या घरातही तीच दोरी सापडली जी मृतदेहाच्या हातपायांना बांधण्यात आली होती. याच आधारे रामकृष्णचे वडील, आई आणि बहीण यांची चौकशी करण्यात आली. त्यांनी गुन्हा मान्य करत आपणच हत्या केल्याचं सांगितलं (Murder of Son).
रामकृष्णची आई-वडील आणि बहीण यांनी सांगितलं, की त्याचा साखरपुडा झाला होता. तरीही तो दिवसभर दुसऱ्याच मुलीसोबत बोलत असे. 2 जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारासही तो फोनवर या मुलीसोबत बोलत होता. यामुळे त्याचे वडील भिमान सिंह नाराज झाले आणि त्याला ओरडू लागले. यावरुनच दोघांमध्ये वाद झाला. वडिलांनी रामकृष्णला कानशिलात मारत धक्का दिला.
या भांडणात रामकृष्ण बाथरूमच्या भिंतीला धडकून खाली कोसळला. यानंतर वडिलांनी त्याच्या छातीवर जोरात लाथ मारली. जेव्हा त्याच्या शरीरात काहीच हालचाल जाणवली नाही, तेव्हा घाबरून वडिलांनी रामकृष्णचे हातपाय दोरीने बांधले. यानंतर त्याची आई जमनाबाई, बहीण कृष्णाबाई आणि पित्याने मिळून त्याचा मृतदेह रुपरेल नदीमध्ये फेकला. आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं असून आता त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.
Published by:Kiran Pharate
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.