मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

वडिलांनी 15 हजारांसाठी केली मुलाची हत्या

वडिलांनी 15 हजारांसाठी केली मुलाची हत्या

परंतु पैसे न दिल्याने सचिनचा पारा चढल्याने वडील आणि मुलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

परंतु पैसे न दिल्याने सचिनचा पारा चढल्याने वडील आणि मुलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

परंतु पैसे न दिल्याने सचिनचा पारा चढल्याने वडील आणि मुलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

    अकोला 18 जानेवारी : अकोल्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आपोती बु. येथे वडिलांनी मुलाचा खून केल्याची घटना घडलीय. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. वडिलांनी पैशाच्या वादातून मुलावर कुऱ्हाडीचे घाव घातले आणि हत्या केली. आरोपी वडीलास बोरगाव मंजू पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.अकोल्यातील सचिन उर्फ कोरकुल उर्फ बॉक्सर भिमराव पळसपगार वय (25) हा त्याच्या वडिलांकडे कायम पैशाचा तगादा लावत असे. घटनेच्या दिवशी त्याने वडील भीमराव रंगराव पळसपगार (59) यांचेकडे 15,000 रुपयाची मागणी केली होती. ही रक्कम मुलीच्या लग्नासाठी लावून ठेवल्याचे वडिलांनी सांगीतले. कापूस आल्यानंतर पैसे देतो असे वडिलांनी सांगितले. परंतु पैसे न दिल्याने सचिनचा पारा चढल्याने वडील आणि मुलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. सचिन हा वडील, सावत्र आई, व बहिणीच्या अंगावर धावून शिवीगाळ करीत हाणामारी व जीव घेण्याची धमकी देत होता. या आधीही त्याने अशाच प्रकारे भांडण केलं होतं.  या नेहमीच्या त्रासाला कंटाळून रागाच्या भरात आरोपी वडील भिमराव पळसपगार यांनी सचिनच्या चेहरा व डोक्यावर, अंगावर कुऱ्हाडीने घाव घालीत सचिनला यमसदनी धाडले. कोट्यवधींची फसणूक, अनेक गुन्हे दाखल, कसा अडकला महाठगसेन जाळ्यात? गावचे पोलीस पाटील बळीराम सिरसाट यांना माहिती मिळताच सचिनला घेऊन अकोला सर्वोपचार रुग्णालय गाठीले परंतु सचिनचा घटना स्थळीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलीसांना मिळताच त्यांनी अकोला सर्वोपचार रुग्णालय गाठीत आरोपी वडील भिमराव पळसपगार यांना ताब्यात घेतलं. आरोपी वाडीलांने गुन्हा कबुल केला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Akola crime

    पुढील बातम्या