Home /News /crime /

मुलीने विवाहाला नकार दिला म्हणून बापाने केली हत्या; हृदयविकाराचा बनाव रचून अंत्यसंस्कारही उरकले

मुलीने विवाहाला नकार दिला म्हणून बापाने केली हत्या; हृदयविकाराचा बनाव रचून अंत्यसंस्कारही उरकले

Murder in Sangali: मुलगा आवडत नाही, म्हणून लग्नाला नकार देणं (daughter refused to marry) एका मुलीच्या जीवावर बेतलं आहे. संतापलेल्या बापाने आपल्या पोटच्या मुलीची निर्घृण हत्या (father killed daughter) केली आहे.

    सांगली, 21 मार्च: मुलगा आवडत नाही, म्हणून लग्नाला नकार देणं (daughter refused to marry) एका मुलीच्या जीवावर बेतलं आहे. सांगतील एका मुलीला सैन्यात नोकरीला असणाऱ्या एका मुलाचं स्थळ आलं होतं. त्याला सैन्यात चांगला पगारही होता, पण मुलगा दिसायला चांगला नाही, म्हणून मुलीने लग्नाला नकार दिला. यामुळे संतापलेल्या बापाने आपल्या पोटच्या मुलीची निर्घृण हत्या (father killed daughter) केली आहे. या हत्येनंतर बापाने मुलीला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव (pretended his daughter suffered heart attack) रचून मुलीवर पहाटे अंत्यसंस्कारही उरकून टाकले आहेत. यानंतर मुलीच्या मृत्यूमागं काहीतरी गौडबंगाल असल्याचा संशय गावातील पोलीस पाटलाला आला, त्यानंतर त्याने याची माहिती पोलीसांना दिली. पोलिसांनी पोलिसी खाक्या देताच आरोपी बापानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बापाचं नाव उत्तप चौगुले असून त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची सर्वात मोठी मुलगी सध्या बारावीत शिकत होती. तिने नुकतेच वयाची अठरा वर्षे पूर्ण केली होती. त्यानंतर तिच्या बापाने लगेच तिच्यासाठी स्थळं शोधायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे सैन्यात नोकरीला असलेल्या एका मुलाचं स्थळ आलं होतं. पण मुलगा पसंत नसल्यानं मुलीनं लग्नाला नकार दिला. त्यामुळे मुलीचे वडिल तिच्यावर नाराज झाले. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, 13 मार्च रोजी उत्तम चौगुले यांच्या घरातील सर्व सदस्य बाहेर गेले होते. यावेळी आरोपी बापाने पुन्हा एकदा मुलीला लग्नासाठी घाट घातला. पण मुलीने याला नकार दिला. त्याने संतापलेल्या बापाने शेतातील गाजरं काढण्याच्या बेडग्याने मुलीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा जीव कधी गेला, हे पित्यालाही कळालं नाही. यानंतर सायंकाळी घरातील सर्व सदस्य घरी परतल्यानंतर आरोपी बापाने मुलीला हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव रचला. त्याच बरोबर कोणालाही काही कळायच्या आत त्याने पहाटे मुलीचा अंत्यसंस्कार देखील उरकून टाकला. हे ही वाचा-कल्याणमधील बारमध्ये काम करणाऱ्या महिलेची घरात घुसून हत्या; फरार प्रियकराला अटक पण अशा संशयास्पद पद्धतीनं अंत्यसंस्कार उरकल्याने गावात कुजबुज सुरु झाली. त्यानंतर गावातील पोलीस पाटील हनुमंत जयवंत पाटील यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले यांनी या घटनेची चौकशी करून मृत्यूचं काळंबेर समोर आणलं आहे. पोलीसांनी पोलीसी खाक्या देताच आरोपी वडिल उत्तम चौगुले यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Marriage

    पुढील बातम्या