• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • पत्नीनं 'या' गोष्टीसाठी नकार दिल्यानं पती बनला राक्षस; 8 महिन्याच्या मुलीची जमिनीवर आदळून हत्या

पत्नीनं 'या' गोष्टीसाठी नकार दिल्यानं पती बनला राक्षस; 8 महिन्याच्या मुलीची जमिनीवर आदळून हत्या

नाजिम पत्नीला घेऊन जाण्यासाठी तिच्या माहेरी पोहोचला होता. त्यानं पत्नीला आपल्यासोबत येण्यास सांगितलं. मात्र, त्यावेळीदेखील नाजिम नशेत असल्यानं दोघांमध्ये वाद सुरू झाले.

 • Share this:
  नवी दिल्ली 01 जुलै : नुकतंच एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. या घटनेत माहेरी असलेल्या महिलेनं सोबत जाण्यास नकार दिल्यानं पतीनं आपल्याच आठ महिन्यांच्या बाळाचा जीव घेतला (Father Killed Daughter) आहे. या व्यक्तीनं बाळाला पत्नीच्या हातातून घेऊन जमिनीवर आदळलं, यानंतर बाळ गंभीररित्या जखमी झालं. मुलीला रुग्णालयात (Hospital) घेऊन जाण्यात आलं मात्र डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केलं. पोलिसांनी (Police) आरोपी बापाला अटक केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बिजनौर येथील आहे. तरुणानं अमानुष मारहाण करत घेतला लहान भावाचा जीव; फक्त 500 रुपये ठरले कारण बिजनौर मंडावली येथील रहिवासी असलेल्या नाजिमचं लग्न राहतपूरच्या मेहताबसोबत दीड वर्षापूर्वी झालं. दोघांची एक मुलगीही होती. मात्र, पतीच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे मेहताबनानं पतीचं घर सोडलं आणि ती आपल्या माहेरी येऊन राहू लागली. नाजिम पत्नीला घेऊन जाण्यासाठी तिच्या माहेरी पोहोचला होता. त्यानं पत्नीला आपल्यासोबत येण्यास सांगितलं. मात्र, त्यावेळीदेखील नाजिम नशेत असल्यानं दोघांमध्ये वाद सुरू झाले. आरोपींच्या स्वागतासाठी मिरवणूक काढणं पडलं महागात; पोलिसांनी पुन्हा केलं गजाआड पत्नी मेहताब हिनं पतीसोबत जाण्यास नकार दिला. याच कारणामुळे रागावलेल्या नाजिमनं पत्नीच्या हातातून बाळ हिसकावून घेतलं आणि आठ महिन्यांच्या चिमुकलीला जोरात जमिनीवर आदळलं. हे पाहून मेहताबच्या पायाखालची जमीन सरकली. या घटनेत आठ महिन्यांची चिमुकली गंभीर जखमी झाली. घरातील सदस्य चिमुकलीला लगेचच रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी नाजिम याला अटक केला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: