नवी दिल्ली 27 सप्टेंबर : हृदय पिळवटून टाकणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. यात एका बापानं क्रूरतेच्या सगळ्या सीमा पार केल्या आहेत. त्यानं आपल्या 39 दिवसाच्या बाळाला इतक्या जोरात आदळलं की या बाळाची 71 हाडे फ्रॅक्चर झाली. यानंतर बाळाचा मृत्यू झाला (Father Killed Baby Boy). आता न्यायालयानं या प्रकरणी 31 वर्षीय आरोपी जेम्स क्लार्क (James Clark) याला या हत्येसाठी (Murder) शिक्षा सुनावली आहे. ही घटना ब्रिटनच्या साउथ ग्लूस्टरशायर (South Gloucestershire) येथील वार्मलीची आहे.
गूढ कायम! तरुणाकडून अल्पवयीन मुलीची छेडछाड, दुसऱ्या दिवशी संदिग्ध अवस्थेत मृत्यू
यात 31 वर्षीय जेम्स क्लार्क यानं आपल्या 39 दिवसांच्या मुलाचे 71 हाडे मोडली. आता कोर्टानं बाळाच्या हत्येच्या गुन्ह्यात क्लार्कला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, ही घटना तीन वर्ष जुनी आहे आणि जानेवारी 2018 मध्ये क्लार्कनं आपला मुलगा शॉन क्लार्क याला झोपवण्याआधी अशा पद्धतीनं आदळलं की यात त्याची 71 हाडे तुटली आणि बाळाचा मृत्यू झाला.
जेम्स क्लार्कनं रात्री आपल्या मुलाला झोपवलं आणि मग तो स्वतःही झोपण्यासाठी गेला. या घटनेनंतर बाळाच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं आणि त्याचा मृत्यू झाला. बाळाची आई हेलेन जेरेमी हिनं म्हटलं, की दुसऱ्या दिवशी तिला हे बाळ मृतावस्थेत आढळलं.
बाळाच्या मृत्यूनंतर त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं, यात असं स्पष्ट झालं की शॉन क्लार्कवर त्याच्या वडिलांनी कमीत कमी तीन वेळा हल्ला केला होता. यात त्याच्या शरीरातील 71 हाडे तुटली होती. यात असाही खुलासा झाला की बाळाच्या डोक्याला मार लागला होता, यामुळे रक्तस्त्रावही झाला होता.
मध्यरात्रीची दारु पार्टी लक्ष्मीपुत्रांना भोवली, पोलिसांमुळे निघाली पायी वरात !
क्लार्कनं आपल्या बाळाला खूप जोरजोरात फिरवलं होतं, यातच त्याची हाडे तुटली आणि डोक्यातून रक्त येऊ लागलं. कोर्टानं याप्रकरणी शिक्षा सुनावताना म्हटलं, की हत्येची प्रत्येक घटना केवळ एक जीव घेत नाही. तर, दुसऱ्यांनाही यामुळे गंभीर पद्धतीनं प्रभावित करते आणि हे अतिशय निर्दयी कृत्य आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder news