'सासरा तंत्र-मंत्र करतो, गर्भवती असताना केला बलात्कार'; सूनेच्या तक्रारीनंतर परिसरात खळबळ

'सासरा तंत्र-मंत्र करतो, गर्भवती असताना केला बलात्कार'; सूनेच्या तक्रारीनंतर परिसरात खळबळ

सून आणि सासऱ्याच्या नात्याला बापलेकीच्या नात्यासमान मानलं जातं. पण सासरा आणि सून या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे.

  • Share this:

बेतूल, 23 जानेवारी: भारतीय संस्कृती सून आणि सासऱ्याच्या नात्याला बापलेकीच्या नात्यासमान मानलं जातं. पण सासरा आणि सून या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. या घटनेतील नराधम सासऱ्याने आपला मुलगा घरी नसताना आपल्याच सूनेवर वारंवार लैगिंक अत्याचार केले आहेत. या पीडित महिलेचा पती डम्पर ड्रायव्हर आहे. त्यामुळे तो नेहमी घराबाहेर असतो. याच संधीचा फायदा घेवून नराधम सासऱ्याने महिलेवर अनेकवेळा अत्याचार केले आहेत, असं पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. या तक्रारीवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.

या पीडित महिलेनं अनेकदा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार केली आहे, पण पोलिसांनी तिचं म्हणणं ऐकून घेतलं नाही. यानंतर संबंधित महिला शुक्रवारी आपल्या कुटुंबियांसोबत बेतूल येथील एसपी श्रद्धा जोशी यांच्याकडे पोहोचली. पीडितेनं एसपी श्रद्धा जोशी यांना सांगितलं की, लग्नाच्या 6 महिन्यांपासूनच तिचा सासरा तिच्यावर बलात्कार करत होता. याची माहिती पीडितेनं तिच्या नवऱ्याला आणि सासूलाही दिली होती. त्यानंतर त्यांनी तिला मारहाण करून माहेरी आणून सोडलं होतं.

हे ही वाचा-कोर्टाचं मन द्रवलं, 90 वर्षीय आईला मिळाली तुरुंगातील मुलाशी बोलण्याची परवानगी!

या पीडित महिलेनं पुढे एसपीला असंही सांगितलं की, तिला घरी सोडल्यानंतर एका आठवड्यातच तिचा सासरा तिला घेण्यासाठी घरी आला. तसेच तिच्या सासरच्या घरी परत येत असताना, नराधम सासऱ्याने वाटेत असणाऱ्या जंगलात तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेनं तिच्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार माहेरच्या लोकांकडे केली. त्यानंतर पंचायत बोलावली गेली. यामध्ये कोणताही निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे शेवटी वैतागून पीडितेने चिचोली पोलिसांत तक्रार दिली. पण या तक्रारीवर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

गर्भवती असतानाही सासऱ्याने केला बलात्कार- पीडित

पीडित महिलेने एसपी श्रद्धा जोशी यांना सांगितलं की, तिचा सासरा एक तांत्रिक असून तो तंत्र-मंत्रा व्यतिरिक्त मुलं होण्याचं औषध देतो. गरोदर असतानाही सासरच्यांने तिच्यावर अत्याचार केले, असंही तिने पोलिसांना सांगितलं. सासरा गळ्यात विविध प्रकारचे तावीज घालून तंत्र-मंत्र करत असतो. त्याचबरोबर सासूच्या निधनानंतर तुला पत्नी म्हणून ठेवेल, असंही सासऱ्यांनी तिला अनेक वेळा सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याचे आदेश एसपी श्रद्धा जोशी यांनी दिले आहेत.

Published by: News18 Desk
First published: January 23, 2021, 9:46 PM IST

ताज्या बातम्या