मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरण, पित्याने दिली सुपारी अन् फिल्मी स्टाइलने टोचलं इंजेक्शन

अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरण, पित्याने दिली सुपारी अन् फिल्मी स्टाइलने टोचलं इंजेक्शन

मेरठच्या कंकरखेडा येथील शिवलोक पुरी येथील ही अल्वपयी मुलगी रहिवासी आहे. ती मुलगी कपडे काढण्यासाठी गच्चीवर गेली होती. त्याचवेळी माकडांनी तिला घेरले.

मेरठच्या कंकरखेडा येथील शिवलोक पुरी येथील ही अल्वपयी मुलगी रहिवासी आहे. ती मुलगी कपडे काढण्यासाठी गच्चीवर गेली होती. त्याचवेळी माकडांनी तिला घेरले.

मेरठच्या कंकरखेडा येथील शिवलोक पुरी येथील ही अल्वपयी मुलगी रहिवासी आहे. ती मुलगी कपडे काढण्यासाठी गच्चीवर गेली होती. त्याचवेळी माकडांनी तिला घेरले.

    मेरठ, 7 ऑगस्ट : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये ऑनर किलिंगचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मुलीच्या प्रेमप्रकरणामुळे संतप्त झालेल्या वडिलांनी स्वतःच्या मुलीच्या हत्येसाठी 10 लाख रुपयांची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण -  प्रेमप्रकरणाच्या रागातून वडिलांनी आपल्या मुलीच्या हत्येचा कट रचला. कटानुसार बाहेरील कंपाउंडर फिल्मी स्टाईलमध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि अल्पवयीन मुलीला विष असलेले इंजेक्शन टोचून तेथून पळून गेला. मात्र, सुदैवाने डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे अल्पवयीन मुलीचे प्राण वाचले. दरम्यान, या संपूर्ण घटनेत सहभागी आरोपी वडील, कंपाउंडर आणि स्टाफ नर्स यांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे. मेरठच्या कंकरखेडा येथील शिवलोक पुरी येथील ही अल्वपयी मुलगी रहिवासी आहे. ती मुलगी कपडे काढण्यासाठी गच्चीवर गेली होती. त्याचवेळी माकडांनी तिला घेरले. त्यानंतर माकडांच्या भीतीने या अल्पवयीन मुलीने छतावरून उडी मारली. यानंतर जखमी अवस्थेत तिला शुक्रवारी कैलाशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर, मुलीला पल्लवपुरम येथील फ्युचर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे, एक बाहेरील कंपाउंडर फिल्मी स्टाईलने आला आणि पोटॅशियम क्लोराईडचे इंजेक्शन देऊन अल्पवयीन मुलीला टोचले. यानंतर या  अल्पवयीन मुलीची प्रकृती बिघडली तेव्हा काहीतरी गडबड असल्याचा संशय डॉक्टरांना आला. अशा स्थितीत त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक तरुण डॉक्टरांच्या ड्रेसमध्ये आयसीयूमध्ये पोहोचला आणि काही वेळातच निघून गेल्याचे त्यांना दिसले. हेही वाचा - प्रियकरासाठी परिवारासोबत बंड, लग्नानंतर तीन वर्षात तरुणीसोबत धक्कादायक कृत्य त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हा तरुण दुसऱ्या रुग्णालयात कंपाउंडर म्हणून काम करतो, असे समोर आले आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपी कंपाउंडर रमेशला अटक केली. पोलिसांच्या चौकशीत आरोपी रमेशने सांगितले की, त्याच्या वडिलांनी किशोरला मारण्यासाठी एक लाख रुपयांची सुपारी दिली होती. यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला आहे. अल्पवयीन मुलीचे जिम चालकाशी प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. त्यामुळे संतापलेल्या पित्याने आपल्याच मुलीच्या हत्येचा कट रचला. पूर्ण नियोजनाअंती त्याने आपल्याच मुलीला हॉस्पिटलमध्ये मारण्याचा कट रचला. मात्र डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे ही अल्पवयीन मुलगी वाचली. सध्या या संपूर्ण प्रकरणात पल्लवपुरम पोलिसांनी आरोपी वडील, कंपाउंडर आणि या संपूर्ण कटात सहभागी असलेल्या स्टाफ नर्सला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. त्यांच्याकडून रिकामी सिरिंज, इंजेक्शन आणि 90 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Love story, Murder news, Uttar pradesh news

    पुढील बातम्या