Home /News /crime /

धक्कादायक! बापाशी लग्न करण्यासाठी बॉयफ्रेंडची हत्या; बापलेकीने मिळून काढला काटा

धक्कादायक! बापाशी लग्न करण्यासाठी बॉयफ्रेंडची हत्या; बापलेकीने मिळून काढला काटा

बापलेकीनं हत्या करून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला.

    व्हर्जिनिया, 03 ऑक्टोबर : प्रेमात माणसं आंधळी होतात याचा प्रत्यय तसा खूप वेळा येतो. प्रेमासाठी लोक आपल्या जवळच्या व्यक्तींच्या जीवावरही उठतात. आपल्या प्रेमाला नकार दिल्यानंतर एखादा तरुण किंवा तरुणीने आपल्या कुटुंबातील व्यक्तीची हत्या केली किंवा प्रेमविवाह केला म्हणून आपल्या पोटच्या मुलीचा-मुलीचा जीव कुटुंबाने घेतला. अशा कित्येक बातम्या आपल्या कानावर आजवर पडल्या आहेत. मात्र व्हर्जिनायातील ही घटना यापेक्षाही धक्कादायक आहे. बापालेकीला लग्न करायचं होतं म्हणून दोघांनीही तिच्या बॉयफ्रेंडची हत्या केली आहे. ही घटना आहे पश्चिम व्हर्जिनियातील (west virginia)  31 वर्षांची अमंडा मॅकक्लुअरने (Amanda McClure) आपला 38 वर्षांचा बॉयफ्रेंड जॉन मॅकग्युअरची (John McGuire) हत्या केली. यामध्ये तिचे वडील  55 वर्षीय वडील लॅरी मॅकक्लुअर (Larry McClure) यांचाही समावेश होता. अमंडा आणि लॅरीचं एकमेकांवर प्रेम जडलं, हे प्रेम म्हणजे बापलेक नात्यातील प्रेम नाही तर लग्नाचं प्रेम. हो बापलेकीचं एकमेकांवर तसं प्रेम जडलं आणि लग्न करण्यासाठी बॉयफ्रेंडचा काटा काढला. फेब्रुवारी 2019 मध्ये ही घटना घडली. याप्रकरणी आता अमंडाला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हे वाचा - पुन्हा काकाच ठरला राक्षस, 8 वर्षीय मुलीवर अत्याचार; 24 तासांत दुसरी घटना ब्ल्युफिल्ड डेली टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार, वॅलेंटाइन डेच्या दिवशी अमंडा आणि लॅरीने जॉनची हत्या केली. त्यानंतर दोघांनीही त्याचा मृतदेह एका खड्ड्यात पुरला. त्यानंतर परत या खड्ड्यातून मृतदेह बाहेर काढला आणि दुसऱ्या खड्ड्यात पुरण्यासाठी नेला. त्याआधी त्यांनी एकमेकांसह शारीरिक संबंधही बनवले आणि नंतर मृतदेह पुरवला. त्यांनी 11 मार्च, 2019 ला लग्न केलं. हत्येचे सर्व पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. मात्र तपासात पोलिसांनी सर्व पुरावे जमा केले. हे वाचा - प्रेयसीच्या घरात रंगेहाथ सापडला पती; भररस्त्यात आणून असा हाणला असा हाणला की.. लॅरीला या प्रकरणात ऑगस्टमध्येच आजीवन कारावास ठोठावला आहे. तिची बहीण अॅनालाही या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. तर आता अमंडाबाबत व्हिडीओ कॉन्फरसिंगमार्फत सुनावणी झाली. तिला 40 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Crime, Murder news

    पुढील बातम्या