भोपाळ 10 डिसेंबर : आई-वडील आपल्या मुलांसाठी अगदी स्वतःचा जीवही धोक्यात टाकायला तयार असतात. याची अनेक उदाहरणं तुम्ही आजवर पाहिली असतील. मात्र, काही अशाही घटना समोर येतात ज्या हादरवून सोडणाऱ्या असतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातून समोर आली आहे. यातील पित्याने केलेलं राक्षसी कृत्य जाणून तुमचाही थरकाप उडेल. यात एक व्यक्ती प्रेमात इतका आंधळा झाला की प्रेयसीच्या सांगण्यावरुन त्याने आपल्याच 15 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केली.
या मुलाचा दोष फक्त इतकाच होता, की त्याने आपल्या पित्याला या महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीमध्ये पाहिलं होतं. मुलाने ही बाब कोणाला सांगू नये या भीतीने पित्याने आधी आपल्या मुलाचे दोन्ही हात कापले, यानंतर गळा दाबून त्याची हत्या केली. यानंतर या व्यक्तीने मुलाचा मृतदेह जंगलात नेऊन फेकला आणि स्वतः घरी येऊन झोपला. मात्र, अखेर पोलिसांनी या हत्याकांडाचा खुलासा केलाच.
मिळालेल्या माहितीनुसार, 6 डिसेंबरला बांगरदा गावात एक मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलिसांची टीम याठिकाणी पोहोचली. झाडांमध्ये पडलेला मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मृतदेहाचे दोन्ही हात कापलेले होते. तपासात समोर आलं की या मुलाची हत्या एक दिवस आधी झाली होती. मृतदेहाच्या अंगावर कपडेही नव्हते. गावकऱ्यांनी हा मृतदेह हरिओम चौहानचा असल्याची ओळख पटवली.
हरिओम आठवीत शिकत होता. तो ५ डिसेंबरला घरातून बेपत्ता झाला होता आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह गावकऱ्यांना शेताजवळ सापडला होता. कुटुंबीयांचं म्हणणं होतं, की त्यांची कोणासोबत काहीच दुश्मनी नव्हती. पोलिसांनी सांगितलं की मोहनलाल चौहानचे शेजारीच राहणाऱ्या चुलत भावाची पत्नी आशा भोसलेसोबत अवैध संबंध होते. गेल्या २ डिसेंबरच्या रात्री मुलाने वडिलांना महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं. तेव्हापासून ती महिला मोहनलालवर सतत दबाव टाकत होती की, एकतर याला मार्गातून हटव, अन्यथा मी आत्महत्या करेन. दोघांची कोठडीत चौकशी केली असता दोघांनी खुनाची कबुली दिली. वडील मोहनलाल यांनी 5 डिसेंबर रोजी शेतात पाणी देण्याच्या बहाण्याने मुलाला घरातून नेले होते.
एकाच रात्री दोनदा शरीरसंबंध ठेवण्यास पत्नीचा नकार, पतीने उचललं टोकाचं पाऊल
पहाटे ३ ते ५ या वेळेत मोहनलालने आधी मुलगा हरिओमचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने मुलाला दोरीने बांधून छतावरून खाली लटकवलं. त्यानंतर वडील मोहनलाल यांनी विळ्याने त्याचे दोन्ही हात कापून त्याची हत्या केली. त्यांनी त्याचे दोन्ही छाटलेले हात बोअरवेलमध्ये फेकून दिले आणि नंतर मृतदेह घेऊन शेताजवळील झुडपात फेकून दिला. ज्या शस्त्राने त्याने आपल्या मुलाचा हात कापला होता तेही पोलिसांनी जप्त केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder